shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या शाबेरा सय्यद यांचा भारत समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव


धर्मवीर छञपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित सन्मान महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तुत्वाचा..साईनगरीत सोहळा संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
भारत मातेच्या कणखर माती जन्मलेल्या कर्तुत्ववान व्यक्तींचा व समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा शिर्डी येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित श्री साईबाबांजीच्या पुण्यनगरीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे सुप्रसिद्ध सिने अभिनेते विजय पटवर्धन सुप्रसिद्ध उद्योजिका मोनिका फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला या कार्यक्रमात शिर्डीच्या ज्येष्ठ नागरिक उद्योजिका व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या श्रीमती साबेरा करीम सय्यद यांना भारत समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


सावेरा करीम सय्यद ह्या महिलांना नेहमीच सांगतात की महिलांचे आयुष्य हे फक्त चूल व मूल ऐत पर्यंत मर्यादित न राहता स्त्रीच्या जातीने शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक स्वावलंबनाचे धडे घेतले पाहिजे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्या स्वतः प्रथम एक उत्तम व्यावसायिक असून मुस्लिम समाजातील असूनही त्यांनी आपल्या प्रगल्भ विचारसरणीने प्रथम आपल्या मुलीस एमएमएस एमएसडब्ल्यू एमबीए पीएचडी एलएलबी एल एल एम इथपर्यंत सुशिक्षित करून तिला स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम बनवून त्यानंतर समाजातील सर्वसामान्य महिलांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करून अनेक रोजगार मिळवून दिले त्यांना झाशीची राणी महिला सामाजिक प्रतिष्ठान सारख्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सामाजिक कौटुंबिक क्षेत्राचे धडे नेहमीच देत असतात व वेळोवेळी सर्वसामान्य महिलांच्या मदतीसाठी तत्पर असतात त्या नेहमी सांगतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्यामुळे स्त्रियांनी शिकले पाहिजे मुस्लिम समाजातील असूनही त्यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम व प्रभुत्व आहे त्यामुळे त्यांना सर्व समाजातील महिलांना काम करण्याची उभारी देण्यास मदत मिळू शकले या त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच की काय त्यांना भारत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे..त्यांना मिळालेल्या  सर्व समाजातील तळागाळातील लोकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

*वृत्त विशेष सहयोग
 पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close