शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डीचा भूमिपुत्र चैतन्य संजय कोते बनला नेव्ही ऑफिसर शिर्डी करांनी केले जल्लोषात स्वागत दहा पावलं चालत येऊन आईला ग्रँड सॅल्यूट केला व आईच्या डोक्यावर नेव्ही ऑफिसर ची टोपी घालताच सर्वांनाच अनावर झाले आनंदाआश्रू पहिल्या पगारात आईची गहाण ठेवलेले दागिने सोडविणार व आईच्या संघर्षाला पूर्णविराम देणार असल्याचे नेव्ही ऑफिसर चैतन्य कोते यांनी सांगितले.
नेव्ही ऑफिसर ची पोस्ट घेतल्यानंतर प्रथमच शिर्डीत आलेल्या चैतन्य कोते या नेव्ही अधिकाऱ्यावर फुलाचा वर्षाव करत जोरदार स्वागत केले स्वागतासाठी आई चुलती नातेवाईक यांच्यासह शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर शिर्डी विविध सेवा सहकारी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष रवींद्र तात्या गोंदकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक दत्तात्रय कोते सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब कोते यांच्यासह अन्य मान्यवर व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलाने सॅल्यूट केल्यानंतर चैतन्याच्या आईला अश्रू व भावना अनावर झाल्या मुलाने माझ्या बरोबरच त्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण केले वडिलांना दिलेला शब्द खरा करून स्वतःला सिद्ध केले असल्याची भावना यावेळी चैतन्य कोते यांची आई जयश्री ताई कोते यांनी व्यक्त केली याप्रसंगी बोलताना शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते म्हणाले की चैतन्य याने आपल्या आईला चार पावले चालत येऊन सॅल्यूट केला व देशाचा अभिमान असलेली नेव्ही ऑफिसरची टोपी आईच्या डोक्यात घातली हा त्या भगिनीच्या दृष्टीने खरोखर खूप भाग्याचा व आनंदी क्षण आहे तर आमच्या सर्वांसाठी गहिवरणारा व डोळ्यात आनंदाअश्रु आणणारा आहे नेव्ही मध्ये अधिक वरच्या पदावर जा मात्र आईचा संघर्ष केव्हाही विसरू नका असा भावनिक सल्ला देत चैतन्यला भावी वाटचालीसाठी कैलास बापू कोते यांनी शुभेच्छा दिल्या तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर म्हणाले की पतीच्या निधनानंतर जयश्रीताई कोते यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून मुलाला नेव्ही ऑफिसर बनवले आहे चैतन्य याने आईचा संघर्ष व कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले चैतन्य याची आई व चुलती यांचा संघर्ष चैतन्यला अधिकारी बनवून गेला
चैतन्य याच्या जिद्दीला चिकाटीला व मेहनतीला सलामच आहे त्याने शिर्डी करांचा नावलौकिक नेव्ही मध्ये सुद्धा वाढवला आहे भारतीय जनता पार्टीचे शिर्डी मंडलाध्यक्ष रवींद्र तात्या गोंदकर म्हणाले कीपतीच्या निधनानंतर अगदी खडतर व संघर्षमय प्रवास करून पतीचे व मुलाचे स्वप्न साकारणाऱ्या जयश्री ताईंना मानाचा मुजरा व सॅल्यूट आहे चैतन्य याने नेव्ही ऑफिसर बनून शिर्डीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून आलेले नेव्ही ऑफिसर चैतन्य कोते सत्काराला उत्तर देताना म्हणाले की मला प्रवेश घेतेवेळी आर्थिक अडचण आली त्यावेळी आईने कानातील सोन्याचे दागिने गहाण टाकले माझ्या पहिल्या पगारातून ते दागिने सोडवल्यानंतर मला खरे समाधान लाभेल आईच्या व नातेवाईकांच्या कष्टाला मी कधीही विसरणार नाही यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.