shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजसेवक श्री. राजाभाऊ राठोड यांचा अल्प परिचय/मनोगत — दि म्युनिसिपल कॉरपोरेशन बँक लि. निवडणूक निमित्त

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणूक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र.

व्हाट्सअप – ९७६८४२५७५७

मुंबई :
मी राजाभाऊ पापालाल राठोड, पाठ्यनिर्देशक परिसेवक, डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, जुहू येथे कार्यरत आहे. मी एम.एससी. नर्सिंग (मेंटल हेल्थ) पदव्युत्तर पदवीधर असून, ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेंटल हेल्थ अँड काउन्सलिंग केले आहे. सध्या अध्यक्ष, टी.एन.ए.आय. महाराष्ट्र राज्य म्हणून कार्यरत असून, दि म्युनिसिपल कॉरपोरेशन बँक लि. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून उमेदवार आहे.


विद्यार्थीदशेपासून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लढा दिला आहे. 2018 पासून मुंबई व पुणे येथे गरजू रुग्णांना मदत, त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, सेवा करणे तसेच गरीब विद्यार्थ्यांना परिचारिका (नर्सिंग) शिक्षणासाठी मदत करत आलो आहे. आतापर्यंत ३,००० ते ४,००० विद्यार्थ्यांना नर्सिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, समस्या सोडवणे, परिचारिकांच्या अडचणी शासन दरबारी मांडणे, आंदोलन उभे करणे, राज्य व देशभरातील परिषदांना उपस्थित राहणे, शैक्षणिक उपक्रम राबवणे ही कार्ये सतत केली आहेत.

2018 ते 2024 या कालावधीत टी.एन.ए.आय. महाराष्ट्र राज्य शाखा येथे मेंबरशिप चेअरपर्सन म्हणून कार्य केले. 2024 पासून राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी निभावत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गोरगरीब जनता व बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेसाठी मदत केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच विविध सामाजिक संस्थांमार्फत गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली आहे.

प्रोफेशनल काउन्सलर म्हणून गोरगरीब जनता व विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे. गावांमध्ये व आदिवासी भागांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश वाटप केले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा भावना निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले. मुंबई व उपनगरातील ज्या गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत त्यांना मार्गदर्शन केले.

कोविड-19 काळात मुक्ताई फाउंडेशन मार्फत 50 कुटुंबांची जबाबदारी घेत त्यांना उपजीविकेसाठी अन्नसाहित्य पुरवले. रक्तदान शिबिरे, आजाराविषयी जनजागृती, तसेच सप्तरंग हेल्थ केअर प्रा. लि. मार्फत आतापर्यंत ८०,००० रुग्णांना होम केअर सेवा पुरवली आहे.

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न, बँकिंग सेवा, विमा, ठेवीवरील व्याजदर, कर्मचारी भरती, एटीएम सुविधा अशा विषयांवर पाठपुरावा 2012 पासून करत आहे.

"फक्त बँक निवडणुकीसाठी नव्हे, तर भविष्यात कुठेही — महाराष्ट्रात किंवा भारतभर — रुग्णालयाशी संबंधित काही गरज भासल्यास, कृपया मला 8693058555 या क्रमांकावर संपर्क साधावा," असे आवाहन श्री. राठोड यांनी केले आहे.

००००

close