प्रतिनिधी - एरंडोल-विखरण- रिंगणगाव व कासोदा-उत्राण- तळई या दोन्ही मंडळांची संयुक्त संघटनात्मक बैठक एरंडोल येथील बस स्टँड समोरील हिमालय मंगल कार्यालयात पार पडली तसेच या बैठकीस जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी संघटनात्मक व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाची प्रस्तावना कासोदा-उत्राण-तळई मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले तर एरंडोल-विखरण- रिंगणगाव मंडळ अध्यक्ष योगेश महाजन (देवरे) यांनी आभार प्रदर्शन केले तसेच अमरजितसिंग पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बैठकीत माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, माजी. जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन व जनजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे व महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी पाटील यांची विशेष उपस्थिती होती.दोन्ही कार्यकारणी मधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.सदर कार्यक्रमास माजी. नगरअध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजीनगराध्यक्ष रवींद्र महाजन,समाधान पाटील, जिल्हा चिटणीस निलेश परदेशी,माजी नगरसेवक सुनील भैया पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक एस. आर.पाटील व माजी तालुकाध्यक्ष ऋषिकेश पाटील हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास एरंडोल शहर व तालुक्यातून सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चा व तोलामोलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.