वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी:
वरुड शहराच्या संगणक क्षेत्रात तब्बल २३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या करिअर कॉम्प्यूटर अँड टेकनिकल इन्स्टिटयूट येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला .
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करून तसेच त्यांना डिजिटल कौशल्य व नवनवीन तंत्रज्ञान शिकवून नवीन दिशा देण्याचे काम एम के सी एल करीत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यपिका कु. प्रणिता शंकरपाळे यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ प्रशिक्षिका गीता ब्राह्मणे यांनी केले ,तर कार्यक्रमाचे संचलन कु. प्राची जेवडे हिने केले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना पुण्यातील स्थापना दिवस कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान कु. रुचिता नानोटकर , कु. नूतन पुंड, कु. सावरी कोल्हे या विद्यार्थिनींचा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. कल्याणी देशमुख हिने केले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपथित होते.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111