shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मालखेडे - उमरे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सचिन पाटील बिनविरोध...!

मालखेडे - उमरे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सचिन पाटील बिनविरोध...!

प्रतिनिधी :- एरंडोल-तालुक्यातील मालखेडे -उमरे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी उमरे येथील सचिन विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन सरपंच सौ. प्रतिभा ईश्वर पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे काल चार सप्टेंबर रोजी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास दगडू पाटील, सौ. सुषमा दीपक पाटील, प्रतिभा पाटील, सचिन पाटील उपस्थित होते. एकूण सात सदस्यांपैकी सौ. पुष्पाबाई समाधान पाटील, दशरथ आधार अहिरे, व सौ. सपना संजय भील हे तीन सदस्य अनुउपस्थित राहिले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. के. पटाईत व ग्रामपंचायत अधिकारी एम. बी. महाजन यांनी काम पाहिले. सचिन पाटील यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले आहे..‌‌

close