एरंडोल (ता. ४ सप्टेंबर) – रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनोगत व भाषणांनी झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. आर. पाटील सर यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री. राठी सर, उपमुख्याध्यापक श्री. नेटके सर व पर्यवेक्षक श्री. नारखेडे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनप्रवासाची माहिती देत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला.