एरंडोल (५ सप्टेंबर):भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल येथे शिक्षक दिन अत्यंत उत्साहात व गौरवमय वातावरणात साजरा करण्यात आला.
🌸 कार्यक्रमाची सुरुवात...
सरस्वती पूजन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यास डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. गोविंदराव अहिरराव व महात्मा फुले हायस्कूलचे सेवानिवृत्त प्रा. बी. एस. चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
👏 शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान...
पाहुण्यांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शुभेच्छापत्रे व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री व उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
🎤 पाहुण्यांचे मार्गदर्शन
प्रा. अहिरराव सर यांनी “विद्यार्थी-शिक्षक परस्पर अपेक्षा” या विषयावर मार्गदर्शन करत शिक्षणातील संवाद व नातेसंबंध महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
प्रा. चौधरी सर यांनी शास्त्री दांपत्याच्या कार्याचा गौरव करत त्यांना “आधुनिक युगातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले” अशी उपमा दिली.
📝 प्राचार्यांचे विचार...
प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत “शिक्षकांचा आदर हीच खरी शैक्षणिक परंपरा आहे” असे सांगितले. तसेच “ध्येय गाठण्यासाठी दिव्य दृष्टी आवश्यक आहे” असा प्रेरणादायी संदेश दिला.
🎙️ सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन...
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केली तर प्रा. जावेद शेख यांनी आभारप्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे वातावरण आणखी उत्साहवर्धक झाले.