आम्हीच घडवलो किल्ले-बुरुज,
आम्हीच बांधली धरणांची सज,
आम्हीच उभी केली रेल्वेची वाट,
तरी का आम्हीच झालो उपेक्षित जात?
रक्ताचे थेंब घामाशी मिसळले,
हाडं झिजून स्वप्नं उभी राहिली,
देश उभा राहिला आमच्या खांद्यावर,
पण आमचं आयुष्य पाळावरचंच राहिलं!
🚩 इतिहासाच्या काळ्या पानावर,
“गुन्हेगार जमात” नाव कोरलं,
देशासाठी लढणाऱ्यांना,
स्वातंत्र्य पाच वर्षांनीच दिलं!
३१ ऑगस्टला स्वातंत्र्य आलं,
पण आमच्या हक्कांना कुठं उजाडलं?
विमुक्त नावाखाली सावलीत ठेवलं,
आमच्या अस्तित्वालाच जगाने गाडलं!
🔥 उठा उठा रे बांधवांनो,
ही काळ्या दगडाची रेघ आहे,
अन्यायाच्या साखळ्या फोडायला,
क्रांतीची वेळ आजच आहे!
आजही पालावरती रात्र थंडीने कुडकुडते,
घरकुलासाठी पिढ्या भटकतात,
आधारकार्ड न मिळालेल्यांचे आवाज,
राजकारण्यांच्या टेबलवर कुजतात!
८० लाखांचा महासागर असूनही,
नेतृत्वाचा दीप विझलेला,
आपल्यालाच आपलं रण उभं करावं लागेल,
हक्काचं किल्ला आपणच जिंकायचं आहे!
🚩 एकीचा मंत्र, ज्वालामुखीचा ज्वाला:
“दगड फोडणाऱ्या हातात आता
क्रांतीची मशाल पेटू दे,
हक्कांच्या लढाईच्या रणात
आपलं अस्तित्व घुमू दे!”
🔥 *घोषणांचा आवाज आभाळ फोडेल:*
“आरक्षण आमचं जन्मसिद्ध आहे!”
“अन्यायाचा नाश होईल!”
“वडार समाजाचं नाव
इतिहासावर सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल!”
कवी रमेश जेठे सर,
संपादक:-"शिर्डी एक्स्प्रेस"
अहिल्यानगर
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥