छ. संभाजी नगर मधील उपोषणकर्त्यांची विशेष उपस्थिती
मुख्यमंत्री यांनी आश्वासन पाळावे नर्सिंग विद्यार्थी यांची मागणी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
परभणी, दि. ०४/०९/२५: वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांनी परिचारिका भरती प्रक्रियेत 80% टक्के महिला व 20%टक्के पुरुष नुकतीच अशी अधिसूचना काढण्यात आली, यावर राज्य भरातील नर्सिंग विद्यार्थी व युवकांमध्ये तिव्र नाराजी आहे, याबाबत अधिक माहिती अशी की, DMER वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे राज्यभर विविध महाविद्यालय व रुग्णालय आहेत त्यामध्ये परिचारिका पदवी महाविद्यालय व त्याला जोडून रुग्णालय आहेत, या सर्व रुग्णालयात परिचारिकांची मोठी गरज भासत असते याच्या संबंधित भरती प्रक्रिया राज्य सरकार मार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे राबविण्यात येत असते, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाने परिपञक काढून अचानक 80%टक्के महिला परिचारिका व 20% टक्के पुरुष परिचारिक असा लिंगभेदी निर्णय घेतला अशी तिव्र भावना नर्सिंग महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी व शिक्षन पुर्ण झालेल्या युवकांनी मांडत राज्यव्यापी मेळावा आयोजित केला होता तसेच मेल नर्सेस बचाव समिती च्या माध्यमातून आपल्या तिव्र भावना शासनदरबारी मांडण्यासाठी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व सर्वांना निवेदन देऊन हा प्रश्न किमान विधानसभा पटलावर मांडावा अशी विनंती करण्यात आली तरीही विधान परिषद सदस्य श्री. सत्यजीत तांबे साहेब वगळता आतापर्यंत एकाही विधानसभा सदस्याने हा मुद्दा मांडलेला नसल्यामुळे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून दि.०५/०८/२५ रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन व मंत्रालयावर मेल नर्सेस बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन केले होते त्याची दखल घेऊन प्रशासनाने दि. ०६/०८/२५ रोजी वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार यांच्यासोबत बैठक लावण्यात आली होती, त्या बैठकीत समितीतर्फे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे व रद्दबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे ती बैठक असमाधानकारक झाली.
त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे दि. ११/०८/२५ आयोजित केले होते त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला जवळपास सर्वच विद्यार्थी संघटनांनी दिवसभरात आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला होता, यावर काही निर्णय न झाल्यास सर्व विद्यार्थ्यांतर्फे राज्यभर आणखी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.
या जनआंदोलनाचाच पुढचा भाग म्हणून दि. १८/०८/२५ रोजीपासून छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे तब्बल (११) अकरा दिवस बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते या उपोषणादरम्यान संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस हे संभाजीनगर दौऱ्यावर असताना त्यांची शिष्टमंडळाला विमानतळावर भेट घडवून आणण्यात आली होती, त्यात मुख्यमंत्री म्हणाले होते की ८०:२० बद्दल मला माहिती आहे मी यावर तातडीने करतो, तातडीने करतो असे आश्र्वासन दिले होते त्यामुळे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते...
या जनआंदोलनाचा पुढचा भाग म्हणून उपोषणकर्ते सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे, शंकर नाईकनवरे, अनंत सानप यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय मेल नर्सेस बचाव समितीच्या राज्य कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे, त्याची सुरुवात परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज ०४/०९/२५ रोजी पासून पुन्हा तीव्र निदर्शने करून करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. या समितीच्या लढ्याला नर्सिंग मुली व सद्य स्थितीत शासनदरबारी काम करत असलेल्या फिमेल (महिला) नर्सेस यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे...
मुख्यमंत्र्यांनी तातडीने रद्द करतो हा दिलेला शब्द पाळावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा मेल नर्सेस बचाव समितीतर्फे राज्य समन्वयक सम्यक जमधडे, डेव्हिड लोखंडे, सतीश सर्वगौडे, शंकर नाईकनवरे, दुर्गादास शिंदे, सचिन खंदारे, अनंत सानप,उमेश मुळे, हसन सर, संतोष सर, संभाजी लोखंडे, राहुल सारूक, किरण घाडगे यांनी केले आहे...