शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:-
पुणे :- शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११. ३० वा. वडार समाजातील विविध संस्था/संघटना पदाधिकारी यांचे शिष्ट मंडळाने कालिदास भांडेकर यांचा MIDC मुख्य अभियंता (पश्चिम) म्हणून पदोन्नती मिळालेबद्दल त्यांची भेट घेऊन त्यांना पुणेरी पगडी व शाल देऊन अभिनंदन व सत्कार केला.
यावेळी सर्वश्री मा कर्नल ऋषिकेश धोत्रे, श्रीकृष्ण गुंजाळ, कार्यकारी अभियंता - जल संपदा, पुणे योगगुरू सुरेश विटकर, सेवानिवृत्त - उपआयुक्त विक्री कर, भानुदास माने, सेवानिवृत्त - उपायुक्त पुणे मनपा, मनोहर मुधोळकर, उद्योजक, रमेश शिंदे, उद्योजक सोलापूरचे अप्पाराव इटेकर, नागनाथ मंजेली, कमलाकर मुदगल, उद्योजक, शामराव पवार, विठ्ठल रणशूर, अशोक देवकर, नामदेव धनावडे, नलावडे, हरिदास धनावडे, बालाजी शिंदे, अशोक पवार, विजय विटेकर, शाम विटकर, लखन पाटकर, लक्ष्मण चौगुले, हरिष बंडीवडार, उलगा गुंजाळ इ. समाज बांधव उपस्थित होते.

