shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाज ऐक्यासाठी झटणारे हरिषदादा बंडीवडार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..,!

पुणे : वडार समाजाच्या ऐक्यासाठी, बोली साहित्य जपण्यासाठी आणि समाजातील तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी सातत्याने झटणारे, अखिल वडार बोली साहित्य मंडळ पुणे संस्थेचे सह-कार्याध्यक्ष श्रीमान हरिषदादा बंडीवडार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



समाजकारण हेच आपले कर्तव्य मानून त्यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रमांमधून कार्य केले आहे. निस्वार्थ भावनेने समाजातील बांधवांसाठी सतत धावून जाणारे आणि लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

वाढदिवसानिमित्त समाजातील अनेक टि.एस.चवहाण, मनोहर मुधोळकर, रमेश जेठे सर, अशोक पवार, शांताराम मनवरे,अनंता देवकर सर व महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. जीवेत शरदः शतम् या मंत्रासह, दादांना आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाधान लाभावे, ही प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

००००


close