प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
दहिफळ वडमाऊळी: या जगात आई-वडिलांएवढे कोणीही मोठे नाही. त्यांच्या सेवेत आनंद मानल्यास आपल्याला सर्वकाही प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊळी येथील शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे कै. चंद्रकलाबाई सखाहरी गदळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. 'आई-वडिलांची सेवा करून त्यांना आनंदित ठेवा. या जगात आईशिवाय कोणीही मोठे नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना समाधान महाराज शर्मा म्हणाले की, "देवाला 'माझा' म्हणा, म्हणजे आपल्यालाही सर्वकाही मिळेल. संत जनाबाईंनी पांडुरंगाला 'माझा पांडुरंग' म्हटले होते, त्याचप्रमाणे आपणही देवाला 'माझे' म्हणायची सवय लावा."
या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर, माजी जि. प. उपाध्यक्ष विक्रम बाप्पा मुंडे, सभापती अंकुश इंगळे, ज्येष्ठ नेते नंदकुमार मोराळे, रमाकांत बापू मुंडे, जी. बी. गदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर, तालुकाध्यक्ष भगवान केदार, मुरलीधर ढाकणे, धैर्यशील देशमुख, सरपंच अनिता दहिफळकर, ह.भ.प. सखाहरी गदळे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल गदळे, डॉ. शशिकांत दहिफळकर, डॉ. शालिनी कराड, शरद गदळे, उपसरपंच बंडू ठोंबरे, माजी सरपंच बाळासाहेब मोराळे, मारुती गाताडे, पी. डी. मुरकुटे, शरद इंगळे, शिवाजी पाटील, अमर पाटील, महादेव अण्णा सूर्यवंशी, चंद्रभान पाळवदे, संतोष शर्मा, अंकुश कलाने यांच्यासह पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.