shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रक्षोभकार प्रा.डॉ.प्रकाश जाधव यांची अखिल वडार बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

पुणे (प्रतिनिधी) —
अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे वतीने आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीत तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन -2025 अध्यक्षपदी निवड समितीने एकमताने निश्चित करण्यात आले.

यावेळी बैठकीचे अध्यक्ष टी. एस. चव्हाण, ते. संभाजी नगर तसेच समिती सदस्य हरिष बंडीवडार, पत्रकार रमेश जेठे,  मनोहर मुधोळकर (सोलापूर), प्रा.शशिकांत जाधव मंगळवेढा, लेखक सतीश पवार कोल्हापूर व अशोक पवार (पुणे) उपस्थित होते.
          बैठकीत विचारविनिमय करून अहिल्यानगर येथील प्रा. डॉ. प्रकाश जाधव यांचे नाव तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - 2025 अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 
         सदर साहित्य संमेलन रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथील येरवडा येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर पुणे या सभागृहात भव्यदिव्य आयोजनाने पार पडणार आहे.
       प्रा. डॉ. प्रकाश जाधव यांच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकारी व साहित्यप्रेमींनी आणि समाज बंधू भगिनी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून संमेलन यशस्वी होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
0000
close