shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश मुठे यांच्याकडून शाळेस शैक्षणिक साहित्य भेट


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
ज्या शाळेने पायाभरणी केली तसेच जिद्द व कष्ट करण्याची हिम्मत दिली त्या शाळेला आपण कदापिही विसरू शकणार नाही असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेणारे ऋषिकेश मुठे यांनी केले.

बालवयात ज्या शाळेत जिद्द व चिकाटीचे धडे घेतले अशा अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी (वागदरी) ता .अकोले या शाळेचे  माजी विद्यार्थी ऋषिकेश मुठे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन विद्यार्थ्यांची दिवाळी साजरी केली.
ऋषिकेश बाळू मुठे (हल्ली कोपरा मांडवा) हे सध्या स्थितीत पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडलेली आई आणि वडील  यांच्या खंबीर साथीने त्यांनी शालेय शिक्षण पार पाडले. गावातील शाळेचे ऋण फेडता येत नसले तरी व्यक्त करण्याचा त्याचाच एक भाग व्यक्त म्हणून श्री. मुठे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची आई विमलताई मुठे व केंद्रप्रमुख शकील बागवान यांचे हस्ते दहा हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
याप्रसंगी शाळेतील पालक मुख्याध्यापक लक्ष्मण धिंदळे, उपाध्यापिका सुरेखा घुटे, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक परिस्थितीवर मात करून मातृभाषेतील शिक्षण घेऊन प्रसंगी वर्गात शांत न बसता शिक्षकांकडून आपल्या प्रत्येक शंकेचे निरसन करून आकाशात झेप घ्यायला शिकावे.आई वडिलांनी देखील प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांसोबत असायला हवे.- विमलताई बाळू मुठे

वृत प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close