shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिसरे अखिल वडार बोली साहित्य संमेलन पुणे येथे होणार..!

२६ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे शहरात तिसरे अखिल वडार बोली साहित्य संमेलन होणार आहे. सगळीकडे ह्याची चर्चा सुरू आहे. वडार समाजासाठी हा कार्यक्रम फक्त साहित्याचा नाही, तर आपली परंपरा जपण्याचा आणि समाजात नवा आत्मविश्वास आणण्याचा एक सुंदर संधी आहे.


देशभरातून हा तिसरा प्रयत्न आहे, आणि तो महाराष्ट्रातून होतोय, ही गोष्ट खूप अभिमानाची आहे. पुण्याला ह्या उत्सवाचे यजमानपद मिळणे म्हणजे वडार समाजासाठी मोठा गौरव आहे.

इतर भागांनीही या साहित्य परंपरेला हातभार लावावा, आणि आपला वारसा पुढे नेण्याची जबाबदारी उचलावी, ह्याचीच अपेक्षा आहे. आखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे हे मंडळ दरवर्षी अशा उपक्रमांनी समाजाला दिशा देत आहे. यामुळे समाजातील प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळत आहे आणि विचारसरणीत नवा जोश भरतो आहे.

या साहित्य मंडळाची कामगिरी पाहता, त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन:

अध्यक्ष: ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण, छ. संभाजीनगर

उपाध्यक्ष: डॉ. गजानन देवकर, यवतमाळ

कार्याध्यक्ष: उद्योजक मनोहर मुधोळकर, सोलापूर

सचिव: अशोक पवार, पुणे

सहयोगी अध्यक्ष: हरिषदादा बंडीवडार, पुणे

सहसचिव: पत्रकार रमेश जेठे, अहिल्यानगर

कोषाध्यक्ष: शांताराम मनवरे, पुणे


ही टीम सतत वडार समाजाच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक उन्नतीसाठी काम करत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात नवा जोश आणि आत्मविश्वास निर्माण होतो आहे.

✍️ शिवाजी राम चव्हाण
शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष
भटके-विमुक्त आघाडी, औसा, लातूर.
close