प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-
शिवशंभु प्रतिष्ठान आणि जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्त समर्थ नगर (कानडी रोड, केज) येथे आज सोमवार दिनांक 06/10/2025 रोजी'सुर संगम' संगीत मैफिलीचा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान संयोजकांनी केले आहे. या वेळी संगीत मैफिलीसोबत उपस्थितांसाठी मसाला दुधाचा अल्पोपहार देखील ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह द्विगुणित होईल.
कार्यक्रमासाठी गटनेते हरून भाई इनामदार आणि नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या सह पञकार बांधव व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कोरडे (डीके) आणि बालाजी शेवाळे यांनी समर्थ नगर येथील या कार्यक्रमासाठी विशेष नियोजन केले आहे.
या वेळी अनेक मान्यवर , पञकार बांधव तसेच समर्थ नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित रहातील आणि त्यांना संगीत मैफिलीचा तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या अल्पोपहाराचा आनंद घेता येणार आहे. या आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून शिवशंभु प्रतिष्ठान आणि जनविकास फाउंडेशनचे कौतुक होत आहे.


.jpg)

