shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भांडगावच्या विद्यमान सरपंच सौ.पल्लवी नवनाथ भोसले यांची महाराष्ट्र राज्य परीट (धोबी)सेवा मंडळ पुणे च्या इंदापूर तालुका महिला अध्यक्ष पदी नियुक्ती.

भांडगावच्या  विद्यमान सरपंच सौ.पल्लवी  नवनाथ भोसले यांची महाराष्ट्र राज्य परीट (धोबी)सेवा मंडळ पुणे च्या इंदापूर तालुका महिला अध्यक्ष पदी नियुक्ती.
इंदापूर : महाराष्ट्र राज्य परीट (धोबी )सेवा मंडळ शाखा पुणे जिल्हा - येथील तालुकास्तरीय पद नियुक्ती कार्यक्रम श्री क्षेत्र  ओझर (ता. जुन्नर) (दि.९ ऑक्टो) येथे मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलक तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेव (नाना)वाघमारे , संतोष भालेराव , जि. अध्यक्ष विकास अभंग , पुणे जि.अध्यक्ष संगीताताई ननावरे यांच्या हस्ते भांडगाव गावच्या विद्यमान सरपंच सौ.पल्लवी नवनाथ भोसले यांची इंदापूर तालुका महिला अध्यक्ष पदी नियुक्तीपत्र  देण्यात आले.

यावेळी नवनियुक्त पदी निवड झालेले  पुणे जि. युवक अध्यक्ष निलेश गायकवाड,इंदापूर तालुका अध्यक्ष गणेश राक्षे, इंदापूर तालुका युवक अध्यक्ष  गणेश भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन गायकवाड, पुणे  जि.लॉन्ड्री कार्याध्यक्ष  अरुण कारंडे तसेच
राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा परिट चॅरिटेबल  संस्था इंदापूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भोसले ,महादेव पवार,तुषार काटकर , नवनाथ भोसले, राहुल आरडे,अतुल गायकवाड, पिनु शिंदे, नितीन काळे ,संदीप भोसले, कुणाल कारंडे, नाना भोसले, सुदाम गायकवाड, सुभाष दळवी,  अरुण नवले, आबासाहेब शिंदे, प्रशांत शिंदे  इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी  पल्लवी भोसले यांचे अभिनंदन केले.
close