प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
राज्यसभा खासदार सौ. रजनीताई पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच माजी मंत्री व काँग्रेसचे नेते आ. सतेज (बंटी) पाटील व बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीचे वाटप बीड शहरातील ख्वाजा नगर व बार्शी नाका परिसरात करण्यात आले.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. राहुल भैय्या सोनवणे यांच्या हस्ते गरजू पूरग्रस्तांना या मदतीचे वाटप करण्यात आले. या मदतीने पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणकुमार शेप, तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसच्या या पुढाकारामुळे पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध झाली, जिवनावश्यक वस्तूच्या किटच्या वाटपातून सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय काँग्रेस कडून मदतीचा हात पुढे आल्याचे दिसून आले.