पुणे (प्रतिनिधी) :
पुण्यातील कोथरूड येथील बाल शिक्षण विद्यामंदिर ऑडिटोरियममध्ये "फॅन्ड्री" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे विशेष उपस्थित होते.
या सोहळ्याच्या औचित्याने अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन (दिनांक 26 ऑक्टोबर 2025) या भव्य संमेलनासाठी नागराज मंजुळे यांना उद्घाटक म्हणून येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी नागराज मंजुळे यांनी आनंदाने हे निमंत्रण स्वीकारत “मी नक्की येईन” असे आश्वासन दिले.
कार्यक्रमा दरम्यान नागराज मंजुळे यांचा ज्येष्ठ साहित्यिक व मंडळाचे अध्यक्ष टी.एस. चव्हाण सर, उद्योजक रमेश शिंदे पुणे ,कार्याध्यक्ष मनोहर मुधोळकर, सहसचिव रमेश जेठे सर, डाॅ.अशोक बंडखोर सर, पुणे.कार्याध्यक्ष हरीश बंडीवडार तसेच शाम विटकर, वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, पुणे, बालाजी शिंदे महापोलीस न्यूज,पुणे आणि अर्चना लष्कर (मुंबई–पंढरपूर) आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन हे देशातील तिसरे संमेलन असून, यावर्षी ते भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात आयोजित केले जात आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संमेलनात वडार समाजाच्या आरक्षणा संदर्भातील मसूदा ठराव तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे हे संमेलन केवळ साहित्यिक नव्हे, तर समाजिक जाणीव जागवणारे ठरणार आहे.
यावेळी वडार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात (आरक्षण विषयक ) ठराव व मसूदा पारित करून राज्यसरकार व केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
✍️ अखिल वडार बोली साहित्य संमेलन – समाजाच्या स्वाभिमानाचा आणि सांस्कृतिक ओळखीचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. सर्व वडार बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.