एन्.ई.एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी सुरज काळेने मिळवले कुस्तीमध्ये गोल्ड मेडल*
इंदापूर : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा कार्यालय अहिल्यानगर,श्रीगोंदा क्रीडा समिती अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने परिक्रमा शैक्षणिक संकुलन काष्टी येथे *शालेय विभागीय कुस्ती क्रीडा* स्पर्धा दि.7 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत *एन्.ई.एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर* या कॉलेजचा विद्यार्थी *चि. सुरज युवराज काळे * याने 19 वर्षे वयोगटात 86 किलो मध्ये *गोल्ड मेडल* जिंकले आहे. त्याची *राज्यपातळीवर* निवड झालेली आहे
त्याला राजेंद्रकुमार, रणवरे,नंदकुमार रणवरे, धनंजय रणवरे, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे,पर्यवेक्षक खरात, विभाग प्रमुख संदीप रणवरे, जेष्ठ शिक्षक बोंद्रे, किसवे सर यांनी विजय विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना हनमंते सर, मुलाणी सर, चव्हाण सर, शेंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.