बावड्याच्या शौर्य जगतापचे विभागीय शालेय आर्चरी स्पर्धेसाठी निवड
जिल्हास्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेत बावड्याच्या शौर्य जगताप यांनी मिळवले ब्रांझ मेडल.
इंदापूर : बावडा (ता. इंदापूर )येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी मध्ये शिकत असलेल्या शौर्य दीपक जगताप याने नुकत्याच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेत पुणे ग्रामीण 19 वर्षाखालील मुले व मुली जिल्हास्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेत ब्रांझं मेडल मिळवून विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.
शौर्य दीपक जगताप यांच्या यशाबद्दल शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संचालक उदयसिंह पाटील उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरण पाटील, प्राचार्य डी आर घोगरे, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच त्याचे वडील दीपक जगताप, आई आरती जगताप यांनी त्याचे अभिनंदन केले. शौर्य जगताप यास आर्चरी कोच म्हणून जुबेर पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला वेळोवेळी भेटले.
---------------------
फोटो ओळ : शौर्य दीपक जगताप याचा फोटो.