आदित्य तरंगे यांनी मिळवले जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १४ वर्षीय रिकर्व राऊंड प्रकारात सुवर्ण पदक.
इंदापूर : कु. आदित्य चंद्रकांत तरंगे याने दिवे ता.पुरंदर येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १४ वर्षीय रिकर्व राऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकले असून आदित्य हा गुरुकुल विद्यामंदिर गोखली येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे. आदित्य मागील २ वर्षांपासून रोशन अकॅडमी, इंदापूर येथे जुबेर पठाण व फिरदौस पठाण यांच्या धनुर्विद्या खेळाचा सराव करत असून तो जलसंपदा विभाग शाखा अभियंता भिमानगर चंद्रकांत तरंगे याचा थोरला मुलगा आहे. यामुळे आदित्य चे इंदापूर मधील मान्यवरण कडून सत्कार आणि कौतुक होत आहे.