shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाचं मोठं भाग्य..

पुणे:-
पुणे शहरात येत्या २६ ऑक्टोबर २०२५ रोजी तिसरं अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असल्यामुळे आपल्या वडार समाजासाठी हा मोठा अभिमानाचा क्षण आहे.


*पहिलं संमेलन २९ डिसेंबर २०१९ ला झालं होतं. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण अध्यक्ष होते. खरं सांगायचं तर तो दिवस वडार समाजासाठी सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवावा असा होता*.

*दुसरं संमेलन पुणे नगरीत ३० ऑक्टोबर २०२२ रोजी झालं. त्यावेळी प्रा. शशिकांत जाधव अध्यक्ष होते. त्यांनी दिलेले विचार आपल्या तरुण पिढीसाठी दिशा दाखवणारे ठरले*.

*आता आपण तिसऱ्या संमेलनाकडे चाललो आहोत. समाजात चळवळ असेल तरच समाज जगात उभा राहतो. म्हणून साहित्य चळवळ फार महत्वाची आहे. साहित्य म्हणजे आरसा. आपल्या समाजात लेखन कमी असलं तरी काही लेखकांनी पुढे येऊन समाजासाठी लिहिलं. त्यात टी. एस. चव्हाण यांची "वास्तू निर्माते वडार", "भोईड", "चिंगळी", "सलगी", "आक्रोश" अशी पुस्तकं समाजाचं खरं वास्तव्य जगासमोर आणणारी आहेत*.

*आज सुशिक्षित तरुण-तरुणींनी पुढं येऊन साहित्याची परंपरा पुढं न्यायला हवी. म्हणूनच "अखिल भारतीय वडार बोली साहित्य मंडळ, पुणे" दरवर्षी हे संमेलन भरवतं*.

या कामात अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण, उपाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन देवकर, सचिव श्री. अशोक पवार, कार्याध्यक्ष श्री. मनोहर मुधोळकर, सहसचिव पत्रकार रमेश जेठे, कोषाध्यक्ष श्री. शांताराम मनवरे, सहकार्याध्यक्ष श्री. हरीश बंडीवडार यांचं मोठं योगदान आहे

आपण सगळ्यांनी या संमेलनाला हजेरी लावावी, साक्षीदार व्हावं आणि आपल्या परीने आर्थिक मदत करून हा उपक्रम यशस्वी करावा, अशी नम्र विनंती.
धन्यवाद🙏.

सौ. अर्चना लष्कर (पवार)       
समाजसेविका
एम.ए. मराठी, मुंबई
close