प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तूंचा स्वीकार न करता, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याच्या त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या तब्बल ३२,८४,८४०/- रुपये रकमेचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे.
मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, लोकनेत्या मा.ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची विशेष उपस्थिती होती.
'इच्छादानपेटी'तून जमा झाली मोठी रक्कम
आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू न स्वीकारता, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ठेवलेल्या इच्छादानपेटीतून एकूण ३२,८४,८४० रुपये इतकी मोठी रक्कम जमा झाली.
जमा झालेली ही रक्कम दोन स्वतंत्र धनादेशांच्या स्वरूपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली. यातील एक धनादेश ३१,८४,८४० रुपये रकमेचा होता, तर दुसरा स्वतंत्र धनादेश १,००,००० रुपये रकमेचा होता.
या समाजोपयोगी कार्याप्रसंगी आमदार नमिताताई मुंदडा, आदरणीय नंदकिशोरजी काकाजी मुंदडा आणि अक्षय भैय्या मुंदडा हे उपस्थित होते. 'काकाजीं'च्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतकऱ्यांसाठी मदतीचा मोठा हातभार लागणार आहे.