अमळनेर — मराठा समाजभुषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ तालुकास्तरावर मंगळवारी पार पडला. आमदार मा. अमोल पाटील यांना हा सन्मान देतांना,“ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने हा पुरस्कार दिला गेला आहे त्याला सार्थ ठरविण्यासाठी काम सुरू आहे; आता तो काम अधिक जोशात करण्यासाठी मला बळ मिळाले आहे,”असे त्यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई चे अध्यक्ष मा. आ. नरेंद्रजी पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण झाले. खासदार स्मिताताई वाघ मुख्य अतिथी होत्या. यावेळी मा. आमदार डॉ. बी. एस. पाटील, साहेबरावदादा पाटील, नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, पत्रकार पांडुरंगजी पाटील, जि. प. सदस्य जयश्रीताई पाटील यांच्याही प्रमुख उपस्थिती होती.
समाजाचे कार्य व त्यांच्या मान्यतेनुसार, उपसरपंच नथ्थुआण्णा सोनवणे, जि. प. सदस्य गिरिषबापु पाटील, पोलीस अधिकारी विनायकजी कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रयजी निकम, अंधेरी (मुंबई) RTO मयुर यांना विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंतांचे सन्मानही करण्यात आला.
अमळनेर तालुका मराठा समाजाचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा व राज्यस्तरातील मान्यवर, तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. “हा पुरस्कार, आपले आशीर्वाद, मार्गदर्शन व कौतुक हेच प्रेरणा आहेत,”असे आमदार पाटील यांनी नमूद केले. समाजप्रगतीसाठी पुढील काळात सहकार्याची संधी मिळावी, वेळ देईन, असे त्यांनी सांगितले.