shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील बनसुडे विद्यालयाचा डंका पुण्यात वाजला* !

*इंदापूर तालुक्यातील बनसुडे विद्यालयाचा डंका पुण्यात वाजला* !
इंदापूर: (पळसदेव)  -येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयाच्या आठ खेळाडूंचे जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत यश.
तीन गोल्ड, एक सिल्व्हर, तीन ब्रॉन्झ पदकांची कमाई – तीन खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी निवडले गेले.
पुणे येथे काल अरुण वैद्य बॉक्सिंग स्टेडियम मध्ये झालेल्या शालेय जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील मुलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील  बनसुडे विद्यालयाचे विद्यार्थी खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले.
या स्पर्धेत खालील खेळाडूंनी आपापल्या वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक जिंकले व विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली:
* प्रणव मच्छिंद्र शिंदे – 32 किलो वजन गट – 
* आर्यन कल्याण बनसुडे – 34 किलो वजन गट – 
* प्रसाद विनोद बनसुडे – 36 किलो वजन गट – 
या तिन्ही खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
इतर खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली:
* सुरज रावसाहेब पुणेकर – 46 किलो वजन गट – द्वितीय क्रमांक
* अर्णव विजय बनसुडे – 38 किलो वजन गट – तृतीय क्रमांक
* आयुष प्रकाश बनसुडे – 40 किलो वजन गट – तृतीय क्रमांक
* आदेश राजेंद्र कन्हेरकर – 50 किलो वजन गट – तृतीय क्रमांक
या एकूण कामगिरीमुळे इंदापूर तालुक्याने जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकण्याचा मान पटकावला आहे.यात
3 सुवर्ण , 1 रौप्य , व 3 कांस्य पदके प्राप्त केली
तसेच, हर्षदा मच्छिंद्र शिंदे या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष  हनुमंत बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, उप मुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत अभिनंदन व कौतुक करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
close