प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
येवता जिल्हा परिषद सर्कल ओबीसी महिला राखीव झाल्यामुळे या मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) युवा नेत्या सौ. प्रगती सुरज घुले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून, त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.
सौ. प्रगती घुले या भाजपचे युवा नेते सुरज भैय्या घुले यांच्या पत्नी आहेत. या सर्कलमध्ये घुले कुटुंबाचा मजबूत जनाधार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे निष्ठावान सहकारी रामकृष्ण घुले काका यांनी २०१७ पर्यंत याच सर्कलचे प्रतिनिधित्व करत जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा फडकवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
राजकारणातील स्वच्छ प्रतिमा, गटबाजीपासून दूर राहून केवळ विकासावर लक्ष केंद्रित करण्याची घुले कुटुंबाची कार्यशैली त्यांची खास ओळख आहे. सुरज भैय्या घुले यांनीही वृक्षारोपण, लम्पी आजारावरील लसीकरण, किर्तन-महाप्रसाद, भव्य बैलगाडा शर्यत, दसरा मेळाव्याचे नियोजन आणि गावांच्या समस्यांवर सातत्याने पाठपुरावा करून एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून आपला ठसा उमटवला आहे.
येवता सर्कलमधील पूर्वीच्या २० पैकी तब्बल १९ गावांचा समावेश असल्याने घुले परिवाराचा प्रभाव आजही कायम आहे. त्यामुळे सौ. प्रगती सुरज घुले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, या सर्कलमध्ये भाजपसाठी ही उमेदवारी एक विश्वसनीय आणि जिंकण्याची क्षमता असलेला पर्याय ठरत आहे.
पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "विकास, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेले जवळचे नाते हेच घुले कुटुंब येवता जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपची खरी ताकद आहे," असे मत व्यक्त केले आहे.
त्यामुळे आता येवता सर्कलमध्ये सर्वांचे लक्ष सौ. प्रगती घुले यांच्या अधिकृत उमेदवारी घोषणेकडे लागले आहे.