एरंडोल : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शहरातील गुजर मारुती व मढी, समस्त गुजर समाजातर्फे शुक्रवारी (दि.३१) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी सरदार वल्लभभाई पटेल चौकात समाजाध्यक्ष गोपाल पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, सुनील पाटील, अरुण पाटील, माधवराव पाटील, प्रा. जी.आर. महाजन तसेच सर्वोदय प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले.
यानंतर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान ओम नगर व जहाँगीरपुरा परिसरात प्रतिमापूजन करण्यात आले. जहाँगीरपुरा येथे अल्पोपहाराचेही वाटप करण्यात आले.
गुजर मारुती मढी येथे माजी उपनगराध्यक्ष प्रा. मनोज पाटील, आनंद दाभाडे, राजेंद्र शिंदे व रघुनाथ ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


