shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन थाटात संपन्न, अखिल वडार बोली साहित्य मंडळ,पुणे यांचा उपक्रम..


सांस्कृतिक मेजवानीसह ग्रंथदिंडी, कवी संमेलन, परिसंवाद, पुरस्कार वितरण.. 
     
*शब्दांकन... रवी देवकर-सोलापूर* 

प्रत्येकाने लिखाणातून व्यक्त झाले पाहिजे: प्रा.डॉ. प्रकाश जाधव यांचे प्रतिपादन..

पुणे.... (स्व.ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र नलावडे साहित्य नगरीतून).. 



लेखन ही अतिशय प्रभावी अशी कला आहे. वडार बोली भाषेची अस्मिता जपण्यासाठी समाजातील साहित्यिकांनी कथा, कविता कादंबरी लिहून व्यक्त झाले पाहिजे. संविधानाची कास धरत समाजातील अनेक प्रश्न व शोषण लेखणीच्या आणि विचाराच्या माध्यमातून मांडण्याचे कार्य या साहित्य संमेलनातून घडत आहे. लिहिलेले कधीही वाया जात नाही. उलट त्यातून इतरांना ऊर्जा, प्रेरणा मिळत असते. महिला साहित्यिकांची संख्या शून्यावर आहे. त्यामुळे विशेषतः महिलांनी लिखाणातून व्यक्त झाले पाहिजे. अशी अपेक्षा अखिल भारतीय वडार बोली  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 'प्रक्षोभ'कार प्रा. डॉ. प्रकाश जाधव यांनी व्यक्त केली.

 अखिल वडार बोली साहित्य मंडळ पुणे यांच्यावतीने पुण्यातील येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात आयोजित केलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून प्रा.डॉ. प्रकाश जाधव हे बोलत होते. त्याप्रसंगी विचार मंचकावर संमेलनाचे उद्घाटक मंत्रालयातील पर्यावरण विभागाचे अप्पर सचिव मनोहर बंदपट्टे, अखिल  वडार बोली साहित्य मंडळाचे पहिले अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक टी. एस.चव्हाण, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. शशिकांत जाधव, स्वागताध्यक्ष  सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त सुरेश विटकर, प्रमुख वक्ते प्रा. गुलाब वाघमोडे, पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, ओसीसीआय नवी दिल्लीचे मुख्य सल्लागार नरसिंहराव गुंजी, ओसीसीआय आंध्रप्रदेशाच्या अध्यक्षा लक्ष्मी देवम्मा देरंगुला, तामिळनाडू राज्यातील कामराज युनिव्हर्सिटीचे प्रा.उमाराज, मंत्रालयातील सहाय्यक सचिव राजू धोत्रे, गृहविभागाचे सचिव यशवंत लष्करे, सांख्यिकी अधिकारी अशोक पवार, तंत्रशिक्षण विभागाचे अधीक्षक  तथा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संपर्कप्रमुख सुधीर पवार, अंबादास मंजुळे, पुणे महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेविका अपर्णा कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती कुसाळकर,  पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, माजी नगरसेवक धर्मराज घोडके, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी शामराव पवार, अखिल वडार बोली साहित्य मंडळाचे सचिव अशोक पवार, सहसचिव रमेश जेठे, कार्याध्यक्ष मनोहर मुधोळकर, सहकार्याध्यक्ष हरिष बंडीवडार, खजिनदार शांताराम मनवरे तसेच प्रा. श्रीमंत लष्कर, सुनील चौगले, प्रा. दिलीप जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी टी.एस .चव्हाण, उद्योजक राजाराम विटकर, अशोक देवकर, अर्चना लष्करे, शिल्पा देवकर, सुनिता जाधव यांच्या हस्ते ग्रंथदिंडी पालखीचे पूजन करून वडार समाजाचे पारंपारिक वाद्य दुमूलांचा कडकडाट व वडारी बोलीभाषेतील गाणी म्हणत, महापुरुषांच्या नावांचा जयघोष करीत मंगलमय वातावरणात  ग्रंथदिंडी काढण्यात आली. शिस्तबद्धरीत्या काढण्यात आलेल्या या दिंडीतील पालखीत भारतीय संविधान, तसेच वडार समाजातील साहित्यिकांनी लिहिलेली असंख्य पुस्तके ठेवण्यात आली होती. याद्वारे वडारी संस्कृती व परंपरेचे दर्शन घडले.

सांस्कृतिक कार्यक्रमात पायस स्कॉर्डसचे गायक दीपक धनवटे, अतुल आळकुंटे, प्रतीक अळकुंटे, कमलेश रजपूत  अहिल्यानगर येथील गायकांनी समाजरसिकांच्या सेवेत एक अनोखा संगीत नजराणा सादर केला. शिवशाहीर गंगाराम नलावडे, लोकशाहीर घनश्याम जाधव त्यांनी आपल्या पहाडी आवाजात जीवनमूल्यांची कास धरत समाजमनाला प्रबोधित करणारे रचनात्मक आणि स्वरचित बहारदार गीते सादर केली. यानंतर मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगराच्या आवाजाने श्रेया देवकर या मुलीने बहारदार कथक नृत्याचे सादरीकरण केले. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील रामजी चौगुले यांच्यासह इतर कलाकारांनी दुमुल या वाद्यांच्या गजरात वडारी गीतांनी प्रेक्षकांना डोलायला लावले. त्यानंतर प्रा. किसन जाधव लिखित आणि रामजी चौगुले निर्मित व दिग्दर्शित केलेल्या ' सराय तागीन इच्चाक संसारद वाटोळे अय्या ' या लघुचित्रपटातील एका प्रसंगाचे मंचकावर सादरीकरण झाले. यामध्ये भक्ती परदेशी, नागेश विटकर, विशाल पवार ,अरुण सामल, काशिनाथ गोटे, परशुराम चौगुले, भीमाशंकर देवकर यांच्यासह बालकलाकारांनी सहभागी घेतला होता. या कलाकारांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत रोख बक्षीसे दिली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुस्ती समालोचक अशोक धोत्रे यांनी केले. यानंतर प्रा.डॉ.प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 'ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र नलावडे साहित्यस्थळी' पर्यावरण विभागाचे अव्वर सचिव मनोहर बंदपट्टे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर टी.एस.चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकेत साहित्यातून समाजजागृती व्हावी या हेतूने या साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगत वडार समाजातील मागण्यांचे ठराव राज्य शासनाकडे मराठी भाषेत तर केंद्र शासनाकडे हिंदी आणि इंग्रजीतून देण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर प्रमुख वक्ते प्रा. गुलाब वाघमोडे यांनी साहित्य आणि समाजातील नात्यावर भाष्य केले. यानंतर प्रा. शशिकांत जाधव, राजू धोत्रे, डॉ. नरसिंहराव गुंजी, विजयालक्ष्मी देवगोजी आणि या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश जाधव यांनी साहित्य विषयी अनुभव व्यक्त केले. या साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने स्मरणिका तसेच 'कातळशिल्पांच्या पाऊलखुणा' या ई बुक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या उद्घाटन समारंभ सत्राचे सूत्रसंचालन माधुरी चव्हाण यांनी केले तर सुरज मोरे यांनी आभार मानले.

दुपारच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दिलीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 'मराठी साहित्यात चित्रित झालेले वडार समाजाचे चित्रण' या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये प्रा. गणेश फुलारे आणि प्रा.दिलीप जाधव यांनी वडार समाजातील अनेक व्यक्ती, गड, किल्ले, कथांचा संदर्भ देत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त राज्य शिक्षण संचालक एस. एन. पवार, वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामराव विटकर, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, महाराष्ट्र रिपब्लिकन पुणे शहराध्यक्ष अशोक इटकर, क्राईम रिपोर्टर बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. यानंतर तुकाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली 'आरक्षण'  या विषयावर मंथन झाले. या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अशोक देवकर, विष्णू चौगुले, पत्रकार विठ्ठल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमंत लष्कर यांनी केले तर आभार अर्चना लष्करे यांनी केले.

तिसऱ्या सत्रात बाबासाहेब धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनिल विटकर, सुनीता दाते, सीमा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन झाले. यामध्ये आकाश सुपारे, बाबासाहेब पवार, रमेश जेठे, बालाजी शिंगाडे, स्वप्नील धोत्रे, दीपक कुरळपकर, सूरज मोरे, श्रीमंत लष्कर, नंदा इटकर या सहभागी कवींनी एकापेक्षा एक आणि आशयघन कविता सादर केल्या. काही कवितांनी टाळ्या घेतल्या तर काहींनी वन्समोर मिळवला. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन... माधुरी चव्हाण यांनी केले तर सुरज मोरे यांनी आभार मानले.

  *यांचा झाला सन्मान....* 

भोईड शेटयाण्णा चव्हाण यांच्या स्मरणार्थ आणि ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण पुरस्कृत.. *ज्येष्ठ साहित्यिक* *रामचंद्र नलावडे स्मृती* *साहित्यरत्न पुरस्कार...* 
मुकुंद वेताळ पुणे - सेवानिवृत्त कला शिक्षक आणि वृत्तपत्र लेखन काव्य,२) भरत दौंडकर पुणे, शिक्षक, आंतरराष्ट्रीय वडार कवी संमेलन प्रतिनिधी, ३) प्रा. डॉ. दिंगबर मारुती घोडके - संगमनेर सोलापूर वडार बोली भाषात पी एच डी- ४) तुकाराम बाबुराव माने- ठाणे, लेखक व आरक्षक अभ्यासक -

२) *रायगड किल्ला अभियंता* *हिरोजी इटळकर* *स्मृती समाजरत्न* *पुरस्कार...* 

माजी नगरसेवक काळुराम राजाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ आणि उद्योजक संदीप काळुराम शिंदे पुरस्कृत...
१) कर्नल ऋषिकेश भानुदास धोत्रे, लातूर- सैन्यदल अधिकारी, २) सुखदेव नामदेव पवार -पुणे, वडार समाजाचे पहिले राज्य शिक्षण संचालक, ३)राजू तिम्मा शिंदे, सोलापूर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक, सातारा, ४) यलाप्पा कुशाळकर- मुंबई, अध्यक्ष - मी वडार महाराष्ट्र व सामाजिक कार्य- ५) रमेश वामन शिंदे, पुणे- यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्य
*३) क्रांतिवीर प्रितीलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार...* 
 हनुमंत रामचंद्र दाते, बरुरकर याच्या स्मरणार्थ आणि षण्मुखानंद हनुमंत दाते सर पुरस्कृत...
१) आशा दिलीप शिंदे - (सूर्यवंशी),धुळे.. आनंदीबाई जोशी व उत्कृष्ट मातृत्व पुरस्कार प्राप्त-
२)अर्चना पवार - लष्कर, नालासोपारा- अध्यक्ष मी वडार महाराष्ट्र मुंबई उपशहर व अंगणवाडी सेविका, 
 ३) आशा विलास पवार... ठाणे  मी वडार महाराष्ट्रा..सद्या कार्यरत आहे -
४) लक्ष्मीबाई लच्छु पवार..डोंबिवली -सामाजिक कार्यकर्त्या..
५) हर्षाली हरीश कुरळपकर- कोल्हापूर, दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, रौप्य पदक प्राप्त
६) अनिता पवार सांगली, सहायक पोलीस निरिक्षकपदी पदोन्नती
७) स्वप्नाली चव्हाण,,,, सातारा सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड
 ८) श्रद्धा आजीनाथ विटकर, जामखेड ...अहिल्यानगर, महसूल अधिकारी पदासाठी निवड -
९)  सुनिता जाधव, बार्शी- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य -
१०) प्रमिला यशवंत धोत्रे नरखेड,ता. मोहोळ- जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

 *४) शब्दवेधी यल्लाण्णा वड्डर कला क्रिडा व विशेष* *गुणवंत पुरस्कार* 

देहरे अहिल्यानगर येथील ह भ प वैकुंठवासी सखाराम जेठे प्रसिद्ध ठेकेदार यांच्या स्मरणार्थ आणि श्री रमेश सखाराम जेठे शिर्डी एक्सप्रेस  पुरस्कृत...
१) भागवत दशरथ सुरवसे- खर्डा.... सामाजिक कार्यकर्ते
२) बाबासाहेब कोंडीराम पवार, प्रतिभावंत कवी

...... *शुरवीर हरबा वडर विशेष गौरव पुरस्कार*

उद्योजक बुधाजी मुकिंदा शिंदे यांच्या स्मरणार्थ आणि उद्योजक सिताराम बुधाजी शिंदे पुरस्कृत..
 १) संकेत संजय शिंगाडे, कोल्हापूर.. भारत सरकार राष्ट्रीय शिष्यवृती गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी-
२) दत्तात्रय पिसाळ... सातारा वधू वर सूचक व नोकरी विषयक विशेष कार्य
 ३) प्रा. डॉ. दिलीप चव्हाण बुलढाणा -ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार
४) संतोष जिरे, यवतमाळ समुपदेशन करून अनेकांचे जीवन सुखी केली आहे..
५) सत्यवान नलावडे, पुणे.. अल्पशिक्षित ते यशस्वी उद्योजक-
६) अजय शेलार.. मुंबई... तरुण सामाजिक कार्यकर्ते

*६) क्रांतिवीर वड्डे ओबान्ना स्मृती समाजभूषण गौरव* *पुरस्कार* 

सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती शंकरराव यल्लाप्पा मुधोळकर यांच्या स्मरणार्थ आणि अखिल वडार बोली भाषा साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष तथा उद्योजक मनोहर शंकरराव मुधोळकर पुरस्कृत,

१) नितेश नलावडे‌.. टोप... राष्ट्रीय स्तरावरील सांख्यिकी वास्तूजोतिषशास्त्र मध्ये प्राविण्य
२) लहू बंदपट्टे... सोलापूर उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता-
३) विठ्ठल चव्हाण.. सांगली, वडार समाजाचे ज्येष्ठ व निर्भीड  पत्रकार
४) हरिश्चंद्र लक्ष्मण इटकर, अकोला... आदर्श शिक्षक-

५) रवी देवकर.. सोलापूर आदर्श शिक्षक

६) स्वप्नील निपाणीकर - कोल्हापूर.. आठ हजार पेक्षा जास्त शैक्षणिक दाखले वितरित केले. 

या गुणवंतांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ ,बुके देऊन कौटुंबिक सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ या सत्राचे सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षण संचालक एस.एन. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षी चौथे साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे होईल असे मुरलीधर शेलार आणि रामचंद्र मंजुळे यांनी जाहीर केले. या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. प्रतीक्षा दौंडकर व शर्वरी शिंदे या स्वागतपरीनी मंचकावर विशेष परिश्रम घेतले.
close