shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग ११ मध्ये संभाजी (सचिन) नानासाहेब चौगुले यांच्या उमेदवारीने चुरस वाढली; 'सेवा आणि साधेपणा' ठरणार निवडणुकीचा केंद्रबिंदू!


लोकप्रतिनिधी नाही, तर लोकसेवक म्हणून काम करणार! - संभाजी चौगुले यांचा संकल्प

नगर प्रतिनिधी: 
शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून श्री. संभाजी (सचिन) नानासाहेब चौगुले यांची उमेदवारी जाहीर होताच प्रभागातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. त्यांच्या शांत, संयमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वामुळे निवडणुकीत वेगळीच रंगत निर्माण झाली असून, उमेदवारी जाहीर होताच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि तरुण कार्यकर्त्यांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय ठरत आहे.

साधेपणातून रुजलेले समाजकारण,
राजकारणात कोणताही बडेजाव न करता, जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता म्हणून संभाजी (सचिन) चौगुले यांची शिर्डीत ओळख आहे. त्यांचा हा प्रवास एका रात्रीत घडलेला नसून, तो अनेक वर्षांच्या जनसंपर्कातून आणि सामाजिक कार्यातून विकसित झाला आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी नेहमीच हिरीरीने पुढाकार घेतला आहे. "नेता नाही, तर आपल्या हक्काचा भाऊ" अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याने, सामान्य मतदारांना ते आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य वाटतात.

प्रभाग ११ आणि विकासाचे व्हिजन,
शिर्डी शहराचा विस्तार होत असताना प्रभाग क्र. ११ मधील नागरिकांच्या गरजाही वाढल्या आहेत. सध्या प्रभागात नियमित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते आणि पथदिवे यांसारख्या सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. श्री. संभाजी चौगुले यांनी या समस्यांवर ठोस काम करण्याचा संकल्प केला आहे. "केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष कृतीतून विकासकाम उभे करणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने प्रभागाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
युवक आणि महिलांचा वाढता पाठिंबा,
श्री. चौगुले यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे तरुण वर्गात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. यामुळेच, महिला आणि युवकांचे भक्कम पाठबळ त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत
.
वरिष्ठ नेतृत्वाचे भक्कम पाठबळ,
विशेष म्हणजे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते तथा ज्येष्ठ नेते नामदार श्री. बाळासाहेब थोरात आणि सौ. प्रभावती घोगरे यांचा भक्कम आशीर्वाद व सक्रिय पाठिंबा संभाजी (सचिन) चौगुले यांना लाभला आहे. वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि स्थानिक जनसंपर्क यांचा त्रिवेणी संगम जुळून आल्याने चौगुले यांची बाजू अधिक मजबूत झाली आहे.

'लोकसेवक' म्हणून काम करण्याची बांधिलकी
निवडणुकीतील आपल्या भूमिकेविषयी बोलताना श्री. संभाजी (सचिन) चौगुले म्हणाले,
 प्रभाग क्र. ११ मधील प्रत्येक नागरिक हा माझ्या परिवाराचा भाग आहे. पिण्याचे पाणी, उत्तम रस्ते, आरोग्य सुविधा आणि स्वच्छ परिसर हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सन्मानाने मिळवून देणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवण्यापेक्षा, २४ तास उपलब्ध असणारा 'लोकसेवक' म्हणून काम करण्यावर भर देणार आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
त्यांच्या या निखळ आणि प्रामाणिक भूमिकेमुळे प्रभागातील सुज्ञ नागरिक आणि मतदारांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
close