साधेपणा आणि सातत्यपूर्ण समाजसेवा
दत्तात्रय कोते हे शांत, संयमी आणि कार्याभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रभागातील पाणी, स्वच्छता आणि रस्ते अशा मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल “नेतापेक्षा नागरिकांचा माणूस” अशी भावना मतदारांत निर्माण झाल्याचे दिसून येते.
प्रभाग १० : विकासाच्या अपेक्षा
प्रभागाचा विस्तार वाढत असताना पाणीपुरवठा, ड्रेनेज, आंतरिक रस्ते आणि पथदिवे या सुविधांबाबत नागरिकांना काही अडचणी जाणवत आहेत. या समस्यांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन कोते यांनी दिले आहे. “मी कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर जनतेचा बांधील आहे,” असे ते सांगतात.
तरुण आणि ज्येष्ठांचा प्रतिसाद
युवकांशी संवाद आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींकडे त्यांनी घेतलेली दखल यामुळे त्यांना दोन्ही घटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपक्ष म्हणून उभे राहण्याचा त्यांचा निर्णय अनेक मतदारांना सकारात्मक वाटत आहे.
स्थानिक बाजारात जाणे-येण्यासाठी महिलांसाठी मोफत रिक्षा सेवा अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमामुळे दैनंदिन बाजारात जाणाऱ्या महिलांना मोठी दिलासा मिळत असून सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली.
जनतेचा पाठिंबा हाच मोठा आधार
पक्षीय पाठिंबा नसला तरी त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद हेच त्यांचे मुख्य बळ आहे. नागरिक, महिला आणि युवकांचा सहभाग वाढताना दिसत आहे.
“लोकसेवक म्हणूनच काम करणार” — दत्तात्रय कोते
उमेदवारीबद्दल बोलताना कोते म्हणाले,
“प्रभाग क्रमांक १० मधील प्रत्येक नागरिक हाच माझा पक्ष आहे. पाणी, रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत सेवांची उपलब्धता हा नागरिकांचा अधिकार आहे. मला कोणत्याही नेत्याचा आधार नको, मला फक्त जनतेची सेवा करायची आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर लोकसेवक म्हणून काम करणे हाच माझा उद्देश आहे.”
त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभागातील मतदारांतून त्यांचे कौतुक होत असून निवडणुकीत नवे वातावरण निर्माण झाले आहे.

