shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग ५ ला मिळणार हक्काचा 'भूमिपुत्र'; संदीप गणेश तारडे यांच्या रूपाने परिवर्तनाची नांदी!



इथे फक्त आश्वासने नको, तर माणुसकीचा विकास हवाय! - संदीप तारडे 

नगर प्रतिनिधी : 
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीची हवा सुरू होत असताना प्रभाग क्रमांक ५ (कालिकानगर) मध्ये स्थानिक नेतृत्व, विकास प्रश्न आणि प्रभागाच्या प्रतिमा सुधारण्याच्या मुद्द्यांवर यंदाची निवडणूक केंद्रित होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथील रहिवासी असलेले आणि गेली चार दशके या भागात वास्तव्यास असलेले संदीप गणेश तारडे यांनी उमेदवारी दर्शविल्यानंतर प्रभागात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य,
कालिका नगरमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या तारडे यांनी स्थानिक समस्यांची जाण आणि भागातील गरजांची समज या आधारे उमेदवारी जाहीर केली आहे. भागात राहणाऱ्या व्यक्तीलाच येथील प्रश्नांची खरी जाणीव असते, अशी भावना अनेक मतदारांमध्ये दिसून येत असून, प्रभागात स्थानिक उमेदवार या संकल्पनेला अधिक बळ मिळत आहे.

भागाच्या प्रतिमेवर भर,
कालिका नगरला विकासाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेतून मुक्त करण्याची गरज असल्याचा मुद्दा तारडे यांनी पुढे आणला. त्यांच्या मते, मूलभूत सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रित केल्यास प्रभागाला अधिक सकारात्मक ओळख मिळू शकते.

बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष,
प्रभागातील काही ठिकाणी बेरोजगारी वाढत असल्याची नोंद उमेदवारांनी केली आहे. तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करणे, कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे ते म्हणतात. त्यांच्या मते, यामुळे प्रभागातील कायदा-सुव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
थोरात साहेबांची साथ, विकासाचा हात!
राज्याचे ज्येष्ठ नेते, काँग्रेस विधिमंडळ गटनेते नामदार श्री. बाळासाहेब थोरात आणि सौ. प्रभावती घोगरे यांची खंबीर साथ संदीप तारडे यांना लाभली आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि संदीप तारडे यांची काम करण्याची धडाडी, यामुळे प्रभाग ५ मध्ये विकासाची नवी लाट निर्माण झाली आहे. प्रभागातील जनसंपर्क आणि स्थानिक उपस्थितीच्या बळावर तारडे मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.

थेट संवादातून मांडलेली भूमिका,
तारडे यांनी प्रभागातील रहिवाशांशी संवाद साधताना विकासाच्या गतीला नवी दिशा देण्यावर भर दिला. मी ४० वर्षे तुमच्यात राहिलोय, तुमची सुखं-दुःखं जवळून पाहिली आहेत. मला एक संधी द्या, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कालिका नगरचा गमावलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे! गेल्या काही वर्षांत प्रभागातील काही कामे प्रलंबित राहिली आहेत. स्थानिक स्तरावर अपेक्षित सुविधा आणि नियोजन यात विसंगती दिसते. ही परिस्थिती बदलण्याची संधी मिळाल्यास सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणार, पद मिळवणे हा हेतू नाही. प्रभागाला जी दिशा हवी आहे ती देण्याची जबाबदारी मोठी आहे. गेल्या दशकात थांबलेला विकासाचा प्रवाह पुन्हा सुरु करायचा आहे असे ते म्हणाले.
close