shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलात भाजपचा उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मुलाखतींना झळाळले उत्साह.

एरंडोलात भाजपचा उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मुलाखतींना झळाळले उत्साह.

एरंडोल, जळगाव
– यावेळी भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजीत केल्या होत्या. या कार्यक्रमात वस्त्र उद्योग मन्त्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, जळगाव (पश्चिम) निवडणूक प्रमुख आणि आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, ज्येष्ठ नेते माजी आमदार महेंद्रसिंग पाटील,भगवान महाजन, तालुका प्रमुख योगेश महाजन व सुनील भैया पाटील यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरपरिषदेतील १ ते ११ प्रभागातून प्रत्येकी आठ ते दहा इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आणि त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे पक्षात आनंद, उत्साह व जोशाची लहर निर्माण झाली.

close