आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे...
स्वराज्यावर चालून आलेल्या क्रूर, धर्मांध आणि अहंकारी अफजल खानाचा पराभव — हा केवळ एका शत्रूचा वध नव्हता,
तर हा होता अन्याय, अत्याचार आणि धर्मांधतेवरच्या न्यायाच्या व धर्माच्या विजयाचा दिवस!
अफजल खानाच्या गर्वाचा कोथळा बाहेर काढत आणि स्वराज्याच्या वैभवाला गगनभरारी देत,
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं —
"हे स्वराज्य केवळ रयतेच्या कल्याणासाठी आहे,
आणि स्वराज्यावर चालून येणारा प्रत्येक जण शत्रूच आहे,
मग तो कोणत्याही जाती, धर्माचा वा प्रांताचा असो!"
स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी धर्मांधतेच्या काळोखात प्रकाश फेकला,
तर वर्णवर्चस्वाच्या अभिमानात बुडालेल्या महाराष्ट्रद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णीचा सुद्धा त्याच ठिकाणी वध करून
समाजाला एक अमोघ संदेश दिला —
👉 “स्वराज्य हे कोणाचं खासगी नाही, ते रयतेचं आहे!”
एका बाजूला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून दिलं,
तर दुसऱ्या बाजूला न्याय आणि धर्म यांचं संतुलन जपणारं राज्यव्यवस्थेचं प्रारूप उभं केलं.
आजचा हा दिवस केवळ लढाईचा नाही —
तो स्वाभिमान, पराक्रम आणि धैर्याचा उत्सव आहे!
तो आहे त्या महाराष्ट्रधर्माचा जयघोष —
जो अन्यायावर उठतो, आणि सत्यासाठी लढतो!
जय जिजाऊ 🙏
जय शिवराय 🚩
जय स्वराज्य!
०००

