सद्या सर्वत्र दाट झाडेझुडपे वाढलेले आहेत. शहरात तसेच ग्रामीण भागात गावाशेजारी किंवा गावातच एखाद्या पडीत जागेवर गवत / झाडेझूडपे वाढलेले दिसून येते.
अशाप्रकारे दाट वाढलेले झाडेझूडपे मानवास कशाप्रकारे हानिकारक ठरू शकतात हे आपण जाणून घेऊ या.
*स्क्रब टायफस* हा आजार *रिकेटशिया* प्रकारातील *ओरियंटा टूसुगामुशी* या प्रकारच्या जिवाणूमुळे होणारा आजार आहे. हा जिवाणू दाट झाडीझुडपे असणाऱ्या ठिकाणी वास्तव्यास असतो.तसेच उष्ण रक्त असणाऱ्या प्राण्यांच्या शरीरावर देखील हा जिवाणू आडळून येतो.
या कीटकला *चिगार माईट* या नावाने देखील ओळखले जाते.
शरीरावर ज्या ठिकाणी हा *चिगार माईट* चावतो त्या ठिकाणी छोटासा अल्सर तयार होतो त्याला *इशार* असे म्हणतात.
आजाराची लक्षणे :
ताप,डोके दुखी.अंग दुखी,कोरडा खोकला,अंगावर रॅश उठणे इत्यदि प्रमुख लक्षणे आहेत.
अशी लक्षणे असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावा अराम करावा.
उपाययोजना :
असा रुग्ण अडळून आल्यास गावात तणनाशक फवारणी करून मॅलेथीऑन पावडर मातीमिश्रित करून धुरळनी करावी.
पूर्ण अंगभर कपडे परिधान करावे.
दाट झाडाझुडपात जाणे टाळावे.
घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवावा.पाळीव प्राण्यांशी स्पर्श टाळावा.
शेतातून काम करून आल्यावर हात पाय गरम पाण्याने धुवावी.
घरात आजूबाजूला उंदीराची असणारे बिळे बुजवावी.
अशा प्रकारे आपण योग्यप्रकारे काळजी घेतल्यास *स्क्रॅब टायफस* आजारापासून स्वतःचा व आपल्या कुटूंबाचा बचाव करून या आजराचा प्रसार रोखू शकतो.
म्हूणन या *आजाराची भिती न बाळगता योग्य काळजी घेणे* हाच प्रतिबंधात्मक उपाय योग्य आहे.
डॉ प्रमोद पोतदार
वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी

