shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौसे आजम संस्थेच्या निवेदनाची दखल !बेलापूर बाजारतळात स्ट्रीट लाईट सुविधा


अजीजभाई शेख / राहाता 
श्रीरामपूर - तालुक्यातील बेलापूर येथील गौसे आजम सेवाभावी संस्थेच्यावतीने बेलापूर आठवडे बाज़ारतळात स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की,दर रविवारी बेलापूरात प्रवरा नदीच्या तीरावर आठवड़े बाजार भरत असतो.या आठवडे बाजारत मोठ्या प्रमाणावर शेतकरी व भाजीपाला विक्रेते तथा व्यापारी असे सर्वच आपला माल विक्रीसाठी आणत असतात,या बाजारात बाहेर गावचे विक्रेते व ग्राहक देखील येत असतात.हा बाजार सायंकाळी उशीरा पर्यंत चालत असतो परंतु  आठवड़े बाजार या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्यामुळे व्यापारी व बाजारकरु लोकांना खुप त्रास सहन करावा लागत होता, अंधारात भाजीपाला व देवाण - घेवाण करावे लागत होते, हा बाजार आठवडे बाजार असल्यामुळे खूपच गर्दी होत असते, या गर्दीचा व अंधाराचा फायदा घेत भुर्ट्या चोरांकरवी ग्राहकांचे पर्स, मोबाईल लंपास करण्याचे प्रमाण वाढले होते,
करीता व्यापारी व बाजारकरू नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी सदरील ठिकाणी आपण स्ट्रीट लाईट लवकरात लवकर बसवावी अशी मागणी संस्थेद्वारे करण्यात आली होती.
या मागणीची दखल बेलापुर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी,सरपंच, उपसरपंच व सदस्य तथा ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली व बाजरातळात स्ट्रीट लाईट बसविण्यात आले.
या ग्रामपंचायत प्रशासनाच्या या उत्कृष्ट कामगिरी ची प्रशंसा म्हणुन गौसे आजम सेवाभावी संस्थेकडून बेलापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, कृषि उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती तथा गांवकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवे,उपसरपंच चंद्रकांत नवळे पाटील,ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान, मुस्ताक शेख,बाबूराव पवार, गांवकारी पतसंस्था डायरेक्टर अजीजभाई शेख, मोहसिन सय्यद, तसवर बागवान, जिल्हा परिषद उर्दू शाळा समिती अध्यक्ष सरफराज सय्यद,भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह, सागर खरात आदि मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक अली सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सोनू शेख, उपाध्यक्ष निसार शाह, बेलापूर अध्यक्ष अल्कमा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद कार्याध्यक्ष नासीर शेख, रेहान शेख, अजीम शेख, अरमान काझी, अयाज सय्यद, अतिक शेख,फरहान इनामदार, हारून अत्तार, अन्सार अत्तार यांचे वतीने 
बेलापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
close