श्रीरामपूर - येथील ज्येष्ठ पत्रकार शेख बरकत अली यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश चिटणीस अशोक भाई बागुल, पक्षाचे अल्पसंख्यांक सेल श्रीरामपूर शहराध्यक्ष नाजीश शहा, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे प्रदेश युवक अध्यक्ष संदीप पवार, ठेकेदार पंडित मिस्त्री आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राजनीती समाचार वृत्तपत्र व न्यूज चॅनल चे प्रमुख संपादक शेख बरकत अली यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोकभाई बागुल यांच्या शिफारसीनुसार पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. प्रशांत वर्पे यांनी शेख बरकत अली यांची या पदावर निवड करून याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान केले.
श्रीरामपूर येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस याठिकाणी संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री.शेख यांची निवड करण्यात आली,
त्यांना ॲड.संदीप वर्पे यांच्या कार्यालयात त्यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस अशोकभाई बागुल, अल्पसंख्याक सेलचे श्रीरामपूर शहराध्यक्ष नाजीश शाह, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष संदीप पवार, ठेकेदार पंडितराव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री.शेख यांच्या निवडीबद्दल लकी सेठी,ॲड. राजेश बोर्डे, डॉक्टर बडाख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नाजीश शाह, शहर उपाध्यक्ष जुनेद भाई शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहर कार्याध्यक्ष मोहसीन जहागीरदार, साजिद भाई शाह, समाज सेवक मतीन भाई शाह, शिक्षक संघटनेचे नेते रावसाहेब पवार, तालुका अध्यक्ष शिवाजी गोसावी, सुरेश तडके,श्री.वडीतके, सुभाष हळनोर, राजू थोरात, हनुमंत खरात, नाना तुपे, इसाक पटेल, वाल्मीक ढोकचौळे, संदीप पवार, राज मोहम्मद शेख, अकबर भाई शेख, एजाज सय्यद, मुसा सय्यद, लालू भाई शेख, अस्लम भाई सय्यद, कासम भाई शेख, रमजान भाई सय्यद, अबरार भाई शेख, नाझीम भाई शेख,मास्टर सरवरअली सय्यद, रियाज खान पठाण, जाकीर भाई बागवान, शब्बीर भाई कुरेशी, सादिक अली शेख, रसूल सय्यद, हमीद पठाण, सौ. समिना शेख, सौ. जयश्री गायकवाड, सौ. सुप्रिया घोलप, सौ. बानू बी पठाण, आदींनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी उज्वल कार्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

