shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मरणोत्तर नेत्रदान...

मरणोत्तर नेत्रदान...

वाघ नगर येथील रहिवासी सुभाष माधव जयकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा मुलगा योगेश जयकर,पत्नी मालती जयकर तसेच सून योगिता जयकर यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोग तज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोग तज्ञांची टीम त्यांच्या घरी पोहोचली आणि त्यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली .त्यांच्या या नेत्रदानाने कमीत कमी दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. यावेळी त्यांच्या घरी जात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या गौरव केला. यावेळी डॉ. प्रियांका पाटील , डॉ.विवेक साळुंकी हजर होते.

close