shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल न.पा.वर भाजपचा झेंडा ; डॉ. नरेंद्र ठाकूर ९,२९४ मतांनी विजयी.

एरंडोल न.पा.वर भाजपचा झेंडा ; डॉ. नरेंद्र ठाकूर ९,२९४ मतांनी विजयी.

एरंडोल – येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी म्हसावद रस्त्यावरील इनडोअर स्टेडियममध्ये पार पडली. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांनी १४,४८० मते मिळवत ९,२९४ मताधिक्याने दणदणीत विजय नोंदविला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या गायत्री दीपक पाटील दुसऱ्या, तर शिवसेना (उबाठा)चे रघुनाथ राजाराम ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण होऊन २२ नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत जल्लोष केला. शिंदे शिवसेनेने ११ जागांवर विजय मिळवला, भाजपाने ४ जागा राखल्या, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने प्रभाग क्रमांक ११ मधील तिन्ही जागा जिंकल्या, तर ५ अपक्ष उमेदवार विजयी झाले.

मतमोजणी दरम्यान पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील आणि सहाय्यक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी प्रक्रिया पाहिली. निकालानंतर विजयी उमेदवारांनी सवाद्य मिरवणूक काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. सुमारे नऊ वर्षांनंतर लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती नगरपालिकेची सूत्रे येणार असल्याने नागरिकांत अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.

close