बावडा येथे जागतिक मृदा दिनानिमित्त जनजागृती..
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील बावडा येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेच्या महत्त्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत येणाऱ्या रत्नाई कृषि महाविद्यालय ,अकलूज अंतर्गत दिनांक 9 डिसेंबर रोजी गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. मृदेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरवात झाली दरम्यान चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषीकन्या यांनी शेतकऱ्यांना मृदेचे महत्त्व, रासायनिक खतांचा मृदेवर होणारा विपरीत परिणाम आणि मृदेची धूप रोखण्यासाठी ची माहिती दिली.तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.दरम्यान मातीचे रक्षण करणे ही काळाची गरज असून मृदेचे संवर्धन करण्याचा सल्ला कृषी सहाय्यक अधिकारी श्री अक्षय कुंभार यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी मा. सौ .पल्लवी गिरमे (सरपंच) मा .श्री .रणजीत घोगरे (उपसरपंच) मा. सौ. अंबिका पावसे (ग्रामसेवक), अक्षय कुंभार (कृषि सहाय्यक अधिकारी ) ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रगतशील शेतकरी आणि समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते , कृषीकन्या साक्षी बोराटे, सुनैना जाधव, प्रतीक्षा जाधव, श्रद्धा जाधव, श्रद्धा इंगोले, अनामिका कोळेकर, प्राची कोंडलकर, कीर्ती कोळी यांनी सहभाग नोंदवला .कार्यक्रमास प्राचार्य आर. जी. नलावडे (प्राचार्य, रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज) एस. एम .एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) व प्रा.एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा .एच. वी .खराडे (कार्यक्रम अधिकारी)यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

