आफ्रिकेतील खंडाला छोट्या परंतु क्रीडाप्रकर्ष असलेल्या देशांपैकी झिम्बाब्वेचा क्रिकेट इतिहास जरी चढउतारांनी भरलेला असला, तरी त्याने जागतिक क्रिकेटवर काही विस्मयकारक कहाण्या आणि खेळाडू दिले. त्या खेळाडूंपैकी काहींना जन्मानेच झिम्बाब्वेत जन्म झाले असले तरी त्यांनी नंतर इंग्लंडसारख्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले किंवा एका वेळी एका देशाकरता व नंतर दुसऱ्यासाठी देखील यांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केले. हे ठळक प्रसंग केवळ वैयक्तिक निवडींचे नव्हेत; यात राजकीय, आर्थिक, कुटुंबीय व क्रीडा-संधींचा जटिल संगम होता.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
झिम्बाब्वे (पूर्वी रॉडेशिया) मध्ये ब्रिटिश वसाहतीचा सांस्कृतिक व शैक्षणिक प्रभाव असल्याने इंग्लंडशी आणि कौंटी क्रिकेटच्या प्रणालीशी खोल संबंध राहिले. सन १९८०-९० च्या दशकात व पुढे अनेक तरुण प्रतिभांनी इंग्लंडमध्ये नोकरी, शिक्षण किंवा काउंटी क्रिकेटच्या संधी साधून तिथे स्थायिक होण्याचा मार्ग पकडला. या प्रवासामुळे काही जन्मतः झिम्बाब्वेकर इंग्लंडसारख्या देशांचे प्रतिनिधित्व करू शकले.
प्रवासाचे मुख्य कारणे (संक्षेपात)
शिक्षण-व्यवसाय आणि आर्थिक संधी : - काउंटी क्रिकेट व इंग्लंडमधील क्लब प्रणालीमुळे सतत वेतन आणि करिअरचे निमित्त मिळते.
राजकीय / सामाजिक अनिश्चितता : - सन २००० च्या दशकापासून झिम्बाब्वेमध्ये झालेल्या राजकीय-आर्थिक समस्यांमुळे कुटुंबे बाहेर स्थलांतरित झाली. काही खेळाडू कुटुंबासोबत देशाबाहेर गेले आणि तिथेच करिअर उभारले.
क्रिकेट स्ट्रक्चर व संधींचा अभाव : - स्थानिक संरचनेतील अस्थिरता किंवा पुन्हा संधी मिळण्याच्या कमतरतेमुळे स्पर्धात्मक विकासासाठी परदेशी मार्ग स्विकारला जातो.
क्वालिफायिंग नियम (रेसिडेन्सी/नैसर्गिककरण) : - अनेक खेळाडूंना काही वर्षे परदेशात राहून त्या देशाचे व्हिसा/पासपोर्ट मिळवून आंतरराष्ट्रीय खेळासाठी पात्रता मिळाली. गॅरी बॅलन्स यांसारख्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी रेसिडेन्सीटी व ब्रिटिश पासपोर्ट मार्गाने गुणधर्म साधले.
ग्रॅहम हिक – इंग्लंड
जन्म २३ मे १९६६ रोजी सॅलिस्बरी (ऱ्होडेशिया -झिंबाब्वे) येथे झाला. तो इंग्लंडसाठी ६५ कसोटी, १२० वनडे सामने खेळला. ग्रॅहम हिकला झिंबाब्वेत जन्मलेला सर्वात यशस्वी “विदेशी खेळाडू” असल्याचे मानले जाते. झिंबाब्वेचे नागरिकत्व बदलून त्याने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आणि काउंटी क्रिकेटमध्येही अप्रतिम कामगिरी केली. टेस्टमध्ये ३३८५ धावा, वनडेमध्ये ३८४६ धावा करत त्यांनी इंग्लंडच्या मधल्या फळीला स्थैर्य दिले. झिंबाब्वेच्या क्रिकेट व्यवस्थेतील अस्थिरतेमुळे त्यांनी तरुणपणीच इंग्लंडकडे वळणे पसंत केले.
गॅरी बॅलन्स ( इंग्लंड -झिंबाब्वे )
जन्म २२ नोव्हेंबर १९८९ हरारे, झिंबाब्वे येथे सन २०१३ ते २०१७ दरम्यान इंग्लंडसाठी २३ कसोटी खेळला, नंतर सन २०२३ मध्ये झिंबाब्वेसाठी एका कसोटीत प्रतिनिधित्व केले. गॅरी बॅलन्सने इंग्लंडसाठी शानदार कामगिरी करून सन २०१४-१५ दरम्यान टॉप-ऑर्डरमधील महत्त्वाचा फलंदाज म्हणून स्थान मिळवले. सहा कसोटी शतके करून तो नावारूपास आला. नंतर वंशभेदाच्या वादात अडकून त्याला इंग्लंड सोडावे लागले. नंतर सन २०२३ मध्ये झिंबाब्वेत परत गेला. जन्मभूमीबद्दलचे आकर्षण आणि पुनरागमनाची त्याची भावना उल्लेखनीय ठरते.
पीटर (पीजे) मूर – आयर्लंड
जन्म २ फेब्रुवारी १९९१ रोजी, हरारे, झिंबाब्वे येथे झाला. तो सन २०१४ ते २०१९ दरम्यान झिंबाब्वेसाठी तर सन २०२३ मध्ये आयर्लंडकडून कसोटी सामने खेळला. पीजेमूर याने झिंबाब्वेसाठी अनेक वर्षे खेळून नंतर आयरिश वंशामुळे आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले. अशा प्रकारे दोन देशांकडून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या अत्यंत दुर्मिळ खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. झिंबाब्वेच्या मधल्या फळीत ते विश्वसनीय यष्टीरक्षक-फलंदाज मानले जात होते.
कॉलिन डे ग्रँडहोम (न्यूझीलंड)
जन्म २८ जुलै १९८६ रोजी हरारे, झिंबाब्वे येथे झाला. तो उच्च दर्जाचा अष्टपैलू खेळाडू होता. न्यूझीलंडसाठी त्याने ४९ कसोटी, ४५ वनडे व ४१ टी२० सामने खेळले. ग्रँडहोम हा झिंबाब्वेत जन्मलेला परंतु न्यूझीलंडसाठी खेळलेला सर्वात यशस्वी ऑलराऊंडर मानला जातो. त्याच्या दमदार हिटिंग क्षमतेमुळे आणि उपयुक्त गोलंदाजीमुळे सन २०२१ च्या डब्ल्यूटीसी फायनल मध्ये न्यूझीलंडच्या विजयात त्याचा मोठा वाटा होता. झिंबाब्वेने अशी प्रतिभा गमावली याचे खंतजनक उदाहरण म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
सीन अर्वाईन - झिंबाब्वे व नंतर इंग्लंडसाठी पात्रता)
जन्म ६ डिसेंबर १९८२ रोजी हरारे येथे झाला. झिंबाब्वेकडून एकदिवसीय सामने खेळला
नंतर इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट – आंतरराष्ट्रीय खेळण्याची शक्यता होती, परंतु इंग्लंडची कॅप मिळाली नाही.
टॉम करन (इंग्लंड)
जन्म १२ मार्च १९९५ मध्ये केप टाउनमध्ये झाला. परंतु बालपण व प्रशिक्षण झिंबाब्वेमध्येच झाले. इंग्लंडकडून सफेद चेंडूच्या प्रारूपात प्रतिनिधित्व केले. वडिल केव्हीन करन मुळचे झिंबाब्वेचेच, झिंबाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. तांत्रिकदृष्ट्या जन्मस्थान दक्षिण आफ्रिका असले तरी, करेन बंधूंचे क्रिकेटिंग मूळ पूर्णपणे झिंबाब्वेमध्येच आहे. प्रारंभी तो झिंबाब्वेच्या १३ व १५ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे तो इंग्लंडसाठी टी२० व वनडेमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून प्रभावी कामगिरी केली.
सॅम करन (इंग्लंड)
जन्म: ३ जून १९९८ रोजी, नॉर्दनम्प्टन ( इंग्लंड येथे झाला. मात्र बालपण शिंबाब्वे मध्येच गेलं. टॉम करनचा तो सख्खा भाऊ असून इंग्लंडकडून क्रिकेटच्या तिनही प्रारूपात खेळला आहे.
सॅम करन याने झिंबाब्बेत प्रशिक्षण घेतलं तरी इंग्लंडमध्ये जन्मला आहे. हा “असा अपवादात्मक खेळाडू आहे. त्यांचे वडील, झिंबाब्वेचे दिग्गज केव्हीन करन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेट शिकले. सन२०१९ इमर्जिंग प्लेअर ते सन २२ च्या टी२० विश्वचषकचा प्लेअर ऑफ दि टुर्नामेंट अशा चमकदार प्रवासामुळे सॅम करन चांगलाच प्रकाशझोतात आला. करन बंधूंची सेवा झिंबाब्वेला न मिळणे म्हणजे ‘प्रतिभेची हानी’ म्हणून चर्चा होते.
पी. डब्ल्यू जी पारकर ( इंग्लंड )
बुलावाये झिंबाब्वेमध्ये जन्म, नंतर इंग्लंडकडे प्रयान मग तेथे परकीय प्रतिनिधित्वात नोंदवले .
बेन कॅरेन व टवांडा मुएये ( इंग्लंड )
अलीकडेही झिम्बाब्वेत जन्मा संबंधी किंवा झिम्बाब्वेत गेलेले खेळाडू अनेक देशांच्या दुहेरी बॉण्डवर आहेत. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये जन्मलेल्या बेन करनला झिम्बाब्वेने संघात निवडले. तरुण टवांडा मुएये सारखा खेळाडू इंग्लंडमध्ये निर्वासित स्थितीत काउंटी मार्गानं प्रगती करत आहे. हे दर्शवते की झिम्बाब्वेविषयी जुने संबंध आजही बदलत्या रूपाने जगभर पसरत आहेत.
झिम्बाब्वेविरुद्ध जागतिक पैलू लाभ आणि तोटे : -
लाभ : - परदेशी जन्मलेले खेळाडू स्थानिक संघांना आंतरराष्ट्रीय अनुभव, विविध तंत्र आणि व्यावसायिकता आणतात; काहीवेळा तेच संघाचे मेरुदंड बनतात.
तोटे : - स्थानिक प्रतिभावंतासाठी संधी कमी होऊ शकतात; तसेच जन्मभूमीचे भावनिक आणि राष्ट्रीय पेच उभे राहतात. कोणासाठी खेळायचं हे वैयक्तिक मताने गुंतलेले प्रश्न निर्माण होतात.
निष्कर्ष आणि पुढे काय अपेक्षित ?
झिम्बाब्वेच्या क्रिकेट कथेत परदेशी जन्माचे खेळाडू महत्त्वाचे पात्र आहेत. ते देशातील क्रीडा वारसा, स्थलांतर व जागतिकीकरणाचे सूचक आहेत. भविष्यातही काउंटी मार्ग, रेसिडेन्सी नियम व जागतिक ट्वेंटी-२० लीग्समुळे अशा प्रकारच्या करिअर शिफ्ट्स अधिक दिसतील. झिम्बाब्वे किंवा तत्सम क्रिकेट देशांनी स्थानिक संरचना सबल केल्यास ते आपले घरगुती गुणधर्म जपू शकतील आणि परदेशी प्रवाहाचे संतुलन राखणे शक्य होईल.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

