अत्यंत बिकट परिस्थितीतून यशाची झेप
विविध क्षेत्रातुन सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील खंडाळा येथील
किरण बाबुराव बाचकर या विद्यार्थ्यांने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यासोबतच अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेवून बी एम एस डॉक्टर ला नंबर मिळविल्याबद्दल विविध क्षेत्रातून सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थी "किरण बाबुराव बाचकर" यांनी आपल्या खंडाळा या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण घेऊन उर्वरित इयत्ता ५ वी ते १० वी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा याठिकाणी, तर ११ वी १२ वी पर्यंत चे शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे रावबहादुर नारायणराव बोरावके (आरबीएनबी) महाविद्यालय या उच्चशिक्षण संस्थेत इयत्ता दहावीत ९७.२० % मार्क व इयत्ता बारावीत ७१.५० % मार्क मिळवून सरकारी कोट्यातून फ्रीशिप अंतर्गत पुढील बी.एम.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बिकटच आई - वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कुमकुवत असतानाही शिक्षणाची ओढ आणि पुढे काहीतरी करण्याची जिद्द मनात ठेवून विद्यार्थी किरण बाचकर यांनी बारावीपर्यंत आरबीएनबी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले, अनेक अडचणी आणी कठिण परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करत त्यांनी बी एम. एस.प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला आणि अंतर्गत सरकारी कोट्यातून बी.एम.एस. डॉक्टर ला नंबर मिळवला.
या यशामुळे परिसरात त्यांच्या मेहनतीचे कौतुक होत असून सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे, त्यांना प्राध्यापक शेळके सर व पटारे सर आणि कॉलेजमधील शिक्षक वृंद यांचेकडुन मोलाचे मार्गदर्शन लाभले, त्यांच्या या यशाबद्दल आई- वडील, मित्र परिवार,नातेवाईक, माजी सैनिक संघर्ष समिती व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुढे उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करणे असे त्यांनी आपल्या मनोगतात यावेळी बोलताना सांगितले.
*वृत्त विशेष सहयोग
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

