एरंडोल (प्रतिनिधी) – सटाणा तालुक्यातील खामताने येथे नाभिक समाजातील अवघ्या नऊ वर्षीय चिमुरडीवर ७० वर्षीय नराधमाने केलेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने एरंडोल शहर, तालुका ग्रामीण व कासोदा नाभिक संघाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी ११ वाजता मूक मोर्चा काढण्यात आला.
एरंडोल शहरातील नाभिक समाजाच्या मढीपासून सुरू झालेला मोर्चा पांडववाडा, मारवाडी गल्ली, आठवडे बाजारमार्गे म्हसावद नाका ओलांडत उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाला. उपस्थित नायब तहसीलदार प्रवीण भिरव यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकृत केले. त्यानंतर मोर्चा एरंडोल पोलिस ठाण्यात जाऊन पी.आय. यांनाही निवेदन देण्यात आले. अत्याचार्याला अटक झाल्याची माहिती देत समाजबांधवांनी कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी निवेदनातून केली.
या मोर्चात जळगाव जिल्हा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ गांगुर्डे, ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, तालुका उपाध्यक्ष देवराम सोनवणे, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गजानन गांगुर्डे, उपाध्यक्ष किरण बोरसे, सचिव सुनील महाले, निळकंठ अहिरे, गणेश गांगुर्डे, रवींद्र बोरसे, दशरथ पवार, राजेंद्र सोनवणे, समाधान निकम, पुंडलिक गांगुर्डे, भरत फुलपगारे, रवींद्र कुवर, गणेश महाले, विठ्ठल वसाने, सुधाकर सोनगिरे तसेच तळई येथील छोटू भाऊ सोनवणे, पत्रकार सुरेश ठाकरे आदींसह मोठ्या संख्येने महिला व नाभिक बांधव सहभागी झाले.
कासोदा नाभिक संघाचे शहराध्यक्ष विनोद ठाकरे, उपाध्यक्ष अजय निकम, सचिव बंटी ठाकरे, राजेंद्र ठाकरे, वसंत सोनवणे, गोपाल देवरे, बाळा सोनवणे यांची उपस्थिती लक्षणीय होती. एरंडोल नाभिक समाजाने दिवसभर दुकाने बंद ठेवत या मूक मोर्चाद्वारे संताप व्यक्त केला.



