श्रीरामपूर (प्रतिनिधी) :-
हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धार्थ फंड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, सहसचिव अशोक उपाध्ये, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व वर्धा तालुक्याचे तहसीलदार अनिकेत सोनवणे, प्रवीण नेहतराव, सुदर्शन नागरी पतसंस्थेचे चेअरमन देविदास चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भांड, विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड, प्रशासनाधिकारी बी. एस. कांबळे, शालेय समिती सदस्य व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, कारभारी कान्हे,सूर्यकांत कर्नावट,अरुण धर्माधिकारी, ओंकार जोशी, अमोल शेटे तसेच प्राचार्य भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लाकडे, रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे, विद्यालयाचे माजी शिक्षक गिरीधर सोनवणे, दशरथ भोंगळे, सखाराम मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्धा तालुक्याचे तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील स्मृतींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एनसीसी च्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धोंडलकर, संकेत गंधे, अभिजीत सराफ यांनी केले.
या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली.

