shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिकलसेल आजार मुक्तीसाठी आरोग्य विभागाची अरुणोदय मोहिनी मध्ये सहभागी व्हा - डॉक्टर प्रमोद पोतदार

मोर्शी प्रतिनिधी:-
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी  अंतर्गत सिकलसेल आजार मुक्तीसाठी आरोग्य विभागाची अरुणोदय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सिकलसेल मुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ही मोहीम दिनांक 15 जानेवारी 2026 ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक यांचे समुपदेशन व औषध उपचार व विवाहपूर्वी समुपदेशन केल्या जातील तसेच या मोहीम अंतर्गत सिकल सेलची प्राथमिक तपासणी 0 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी आपली तपासणी करून घ्यायची आहे,


 आपण सिकल सेल निरोगी आहे की सिकलसेल वाहक वाहक आहे की सिकलसेल ग्रस्त हे निदान करून घ्यायचे आहे .सिकलसेल निर्मूलनासाठी एक पाऊल पुढे टाकायचे आहे असे आव्हान  मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार उमेश भाऊ यावलकर केले ,तसेच मोर्शी  नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सौ प्रतीक्षा रविभाऊ गुल्हाने तसेच उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोदजी पोद्दार यांनी सिकल सेल तपासणीसाठी जनतेला आव्हान केले आहे.
close