नाभिक समाज बांधवांनी मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे यांचे आवाहन
यवतमाळ / प्रतिनिधी:
महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा वणी यांचे वतीने शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १२-१५ वाजता शेतकरी मंदीर वणी याठिकाणी नाभिक समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा व समाज मेळावा, उप वर वधुवर परिचय मेळावा २०२६ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत (उर्फ गुड्डू) नक्षिणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
या राज्यस्तरीय मेळाव्यास सन्माननीय नाभिक समाज बंधु भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा असे अवाहनही करण्यात आले आहे.
सदरील मेळाव्यात विवाह इच्छुक युवक, युवतीचा स्नेहबंध परिचय, विविध क्षेत्रातील प्राविण्य प्राप्तांचा सन्मान / सत्कार, विशिष्ट मान्यवरांचा समाज गौरव व समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे,
या मेळाव्यासाठी येणारे पाहुणे विदर्भ, मराठवाडा, कोंकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आदी विभागातुन तसेच शेजारील मध्य प्रदेश,छत्तीसगड येथील आपल्या नाभिक समाजाचे आमदार भिलाई वैशाली नगर विधानसभा आमदार रितेश सैन
आवर्जून उपस्थित राहणार आहेत शिवाय तेलंगणा आणी कर्नाटक सह इत्यादी परराज्यातुन समाजातील सर्व समाज बांधव,आमदार खासदार, मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. करीता या राज्यस्तरीय समाज मेळाव्याला सर्वच समाज बंधू - भगीनींची उपस्थिती प्राथनिय असल्याने म्हटले आहे.
समाज मेळावा - २०२६ नियम व सुचना पुढील प्रमाणे - उपवर वधु परिचय मेळाव्यासाठी विवाह इच्छुक युवक युवती नोंदणी शुल्क २०० /- रुपये फी आहे.,विवाहच्छुक युवक युवतीची २ रंगीत फोटो, निवासस्थानाचा पुर्ण पता, जन्म तारीख,जन्म वेळ, जन्म स्थळ, उंची,वर्ण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा तथा भ्रमणध्वनी / दूरध्वनी क्रमांक आदी माहिती दि.१८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोहोचेल अशा बेताने, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा वणी कार्यालय शिवर्थिथ कॉम्प्लेक्स,लखन पाँइंट, वरोरा रोड, वणी येथील पत्त्यावर पाठवावे असे आव्हानही महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे
यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174

