shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वच्छ, सुंदर व सुरक्षित शिर्डी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - दीपक गोंदकर



शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
शिर्डी शहर हे स्वच्छ सुंदर व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आव्हान आरोग्य सभापती दीपक गोंदकर यांनी केले आहे.
     स्वच्छता आरोग्य सभापतीचा पदभार स्वीकारल्यानंतर शिर्डी शहरामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक, नगरसेविका यांचे उपस्थितीत शहरांमध्ये स्वच्छता विभागाचे सर्व सफाई कर्मचारी व विभाग प्रमुख यांना घेऊन दुकानदार ,पानपट्टी व शहरातील विविध व्यावसायिक यांना रस्त्यावर कचरा टाकू नये तसेच साईबाबा मंदिर परिसर व मंदिराच्या बाजूच्या असलेल्या भिंती तंबाखू किंवा गुटखा खाऊन खराब करू नये तसेच रस्त्यावर कचरा टाकू नये कचरा घंटा गाडीतच टाकावा. स्वच्छ व सुंदर शिर्डी ठेवण्याकरिता नागरिकांनी तसेच व्यवसायिकांनी सहकार्य करावे. शिर्डीत देश विदेशातून दररोज हजारो भाविक साई दर्शनासाठी येतात. भाविक विविध दुकानातून वस्तू खरेदी करतात आणि त्या वस्तूबरोबर दिलेले कॅरीबॅग रस्त्यावर टाकतात याबरोबरच त्यांच्याबरोबर आणलेले खाद्यपदार्थ व इतर वस्तू कचरा कुंडीत न टाकता ते देखील रस्त्यावर फेकतात परिणामी मोठ्या प्रमाणात दररोज शहरात साचलेला कचरा गोळा करण्याकरिता स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना साफ करण्याकरिता मोठी कसरत करावी लागते. शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय असल्याने ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो त्याचे विलगीकरण करण्याकरिता नगरपरिषदेने प्रत्येक प्रभागांमध्ये घंटागाड्या उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी इतरत्र कचरा न टाकता ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून घंटा गाडीतच टाकावा. यापूर्वी शिर्डी नगरपरिषदला स्वच्छ सर्वेक्षणाचे पारितोषिक मिळाले आहे. देश-विदेशात येणाऱ्या साई भक्तांना शिर्डीत आल्यानंतर शिर्डी शहर स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे शहर स्वच्छ व सुंदर दिसावे ही आपली जबाबदारी आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी सतीश दिघे तसेच सर्व व्यावसायिक व नागरिकांनी हे शहर आपले आहे असे समजून स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला तर नक्कीच यावर्षी देखील राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा स्वच्छता पुरस्काराचे प्रथम मानकरी हे शिर्डीतील नागरिक त्यातील त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आव्हान आरोग्य सभापती दीपक गोंदकर यांनी नागरिकांना केले आहे.
close