shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझ्या व्यथा मी सांगू कोणालाफुलांनीच माझा घात केलाज्यांना मी काटे समजलो तेच आले मदतीला!ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मला....

सर्वश्री हर्षल प्रधान, रवी म्हात्रे, वरुण सरदेसाई, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, अयोध्या पोळ, ज्योती ठाकरे, शरद कोळी, राजन विचारे, अल्ताफ शेख,केदार दिघे,बंड्या साळवी....


यांच्या पैकी एकाचाही फोन आला नाही, सांत्वनपर संदेशही नाही. आयुष्यातील 53 वर्षे पक्षासाठी दिल्यानंतर इतकेही सौजन्य नसावे. वरील नावे ही मला ओळखणारी आहेत म्हणून नमूद केली.

काय लागते हॊ एक फोन करायला? यांच्यापैकी कोणाला ताप जरी आला तरी काहूर माजते.

बरं यात वैयक्तिक कारण असते तर तेही नाही. ऐन निवडणूक काळात पक्ष वाऱ्यावर सोडून भाजपात गेलेल्या जिल्हा प्रमुखाला मी विरोध केला, म्हणून हा हल्ला झाला, हे स्पष्ट दिसून येत असताना ही अनास्था निष्ठावंतांचे मनोबल वाढवणारी आहे की खच्चीकरण करणारी ? शिव सैनिकांनी जीवावर उदार होऊन विरोधकांशी, गद्दारांशी कसे लढायचे? मी स्वावलंबी आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, इतरांनी काय करावे ?

हॊ, एक नाव विसरलोच की, आपले विनायकराव राऊत यांनी पाच सहा दिवसांनी फोन केला. मात्र त्याचे कारण वेगळेच होते. दिलीपराव हे कसे झाले, इथून सुरुवात करून "तुम्ही रमेश चव्हाणचे नाव का नाही घेतले ?  तुम्ही तर त्याच्या विरोधातही लिहिले होते. याचा अर्थ धनंजय बोडारे वरील लक्ष विचलित करून प्रकरणाला फाटे फोडणे हाच त्यांचा उदात्त हेतू होता. माझ्यावरील हल्ल्यापेक्षा धनंजय बोडारेला वाचविण्याची किती काळजी? धनंजय बोडारे भाजपावासी झाला तरी विनायकरावाना त्याचीच काळजी.

*कोणी फोन करावा कोणी सांत्वन करावे ही अपेक्षा मुळीच नाही. परंतू अश्या वेळी आपले कोण व परके कोण हे कळते.* 

*माझ्या व्यथा मी सांगू कोणाला* 
*फुलांनीच माझा घात केला*
*ज्यांना मी काटे समजलो तेच आले मदतीला!*

माझ्यावरील हल्ल्याला आज 11 दिवस झाले. त्यानंतर माझे मनं मोकळे करण्यासाठी व निष्ठावंतांच्या डोळ्यात अंजन घालण्याच्या हेतूने हे मनोगत लिहिले आहे.

नेते असे वागले तरी उल्हासनगर ,कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, मलंगगड, बदलापूर, मुरबाड, शहापूर, भिवंडी येथील पदाधिकाऱ्यांनी व शिव सैनिकांनी रुग्णालयात व घरी येऊन भेट घेतली. महाराष्ट्रातील माझ्या असंख्य चाहत्यांनी फोन करून विचारणा केली. कोणी आयुर्वेदिक औषधे पाठवली, कोणी जडी बुटी पाठवली. अनेकांनी हल्ल्याचा निषेध करून आरोपीना व सूत्रधारांना अटक करण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर शिंदे गटात गेलेल्या मित्रांनीही विचारपूस केली. काहीजण रुग्णालयात भेटायला आले. असंख्य दैनिक व वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्याशी संबंधित बातम्या दिल्या. विशेष म्हणजे ज्या पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल सर्वसामान्य अविश्वास दाखवतात त्याच पोलीस खात्याने अतुलनीय कामगिरी केली. व. पो. नि. अशोक कोळी व त्यांच्या टीमने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू  दाखवली. Two wheeler ला नंबर प्लेट नसताना व cc footege मध्ये हल्लेखोरांचे चेहेरे स्पष्ट दिसत नसताना त्यांच्यापैकी दोघा हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. स. पो. आयुक्त अमोल कोळी यांनी तपासाची सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन हल्लेखोरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. तिसऱ्या मुख्य आरोपीचा व सूत्रधाराचाही ते शोध घेतील याची मला खात्री आहे.

यामुळेच लढायचे बळ मिळते. मी माझी लढाई सुरूच ठेवणार, लेखणीची तलवार म्यान करणार नाही.

परंतु प्रश्न हाच भेडसावतो की लढायचे तरी कोणासाठी?

*जिस तरह आपने बिमारसे रुखसत ली है*
*साफ लगता है जनाजे में नही आयेंगे*
- खालिद शामी 

माझ्यावरील हल्ल्यानंतर ही तुम्हाला सवड मिळाली नाही त्यावरून मला खात्री आहे की तुम्ही माझ्या अंत्ययात्रेलाही येणार नाही.

जय हिंद ! जय महाराष्ट्र!
close