तोफखाना परिसरातील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) चे निवृत्त अधिकारी श्री. सुभाष गुणाजी श्रीगोंदेकर यांचे दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीगोंदेकर यांनी एस.टी. महामंडळात दीर्घकाळ प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावली. सेवाकालात त्यांनी शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि संयमी अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. सहकाऱ्यांशी स्नेहपूर्ण वर्तन आणि कामातील काटेकोरपणा यामुळे ते सर्वांच्या आदराचे केंद्र होते.
निवृत्तीनंतरही त्यांनी सक्रिय जीवन जगत विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला. वाचन आणि लेखनाची विशेष आवड जोपासत त्यांनी समाजप्रबोधनपर लेखन केले तसेच अनेक युवकांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य केले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुन, नात असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांसह मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली

